मुक्तपीठ टीम
गुगल असिस्टंटसारख्या व्हर्च्युअल असिस्टंटने लाखो स्मार्ट डिव्हाइस युजर्सचे जीवन सोपे केले आहे. ते युजर्सना फक्त त्यांच्या आवाजाने अनेक काम करण्यास सक्षम करतात, रोबोटिक व्हॅक्यूम क्लिनर नियंत्रित करण्यापासून ते लाईट बंद करण्यापर्यंत तो सहज करू शकतो. गुगलचे आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आधारित स्मार्ट असिस्टंटचा एकच आवाज येतो. पण जर रोज तोच आवाज ऐकायचा कंटाळा आला असेल आणि गुगल असिस्टंटच्या आवाजात बदल करायचा असेल तर ते आता सहज शक्य आहे…कसे ते वाचा
अँड्रॉइड स्मार्टफोनवर गुगल असिस्टंटचा आवाज कसा बदलायचा
- सर्वप्रथम, अँड्रॉइड स्मार्टफोनवर ‘Hey Google’ बोलून किंवा फोनच्या बाजूला असलेले गुगल असिस्टंट बटण दाबून गुगल असिस्टंट सक्रिय करा.
- आता ‘चेंज योर वॉइस’ म्हणा.
- त्यानंतर स्मार्टफोनच्या स्क्रीनवर दिसणार्या मॅनेज व्हॉईस सेटिंग्ज बटणावर टॅप करा.
- प्रत्येक आवाज ऐकण्यासाठी व्हॉइस प्रीसेटमधून स्क्रोल करा.
- तुम्ही वापरू इच्छित असलेल्या व्हॉइसवर टॅप करा.
गुगल अॅप वापरून अँड्रॉइड स्मार्टफोनवर गुगल असिस्टंट व्हॉइस कसा बदलायचा
- सर्वप्रथम अँड्रॉईड स्मार्टफोनवर गुगल अॅप ओपन करा.
- त्यानंतर अॅपच्या वरच्या उजव्या कोपर्यात प्रोफाइल आयकॉनवर टॅप करा.
- आता सेटिंग्ज बटणावर टॅप करा.
- आता गुगल असिस्टंट निवडा.
- आता असिस्टंट व्हॉईस आणि साउंड्स पर्यायावर टॅप करा.
- नंतर स्क्रोल करा आणि वापरायचा असलेला प्रत्येक आवाज ऐकण्यासाठी व्हॉइस प्रीसेटवर टॅप करा.
स्मार्ट डिस्प्लेवर गुगल असिस्टंट व्हॉल्यूम कसा बदलावा
- सर्वप्रथम गुगल अॅप उघडा.
- डिस्प्लेच्या वरच्या उजव्या कोपर्यात, प्रोफाइल चित्रावर टॅप करा.
- त्यानंतर असिस्टंट सेटिंग्ज पर्यायावर टॅप करा.
- आता “ऑल सेटिंग्जमध्ये” असिस्टंट व्हॉइस पर्यायावर टॅप करा.
- सर्व उपलब्ध आवाजांमधून स्क्रोल करा आणि वापरायचा असलेला आवाज निवडण्यासाठी टॅप करा.