मुक्तपीठ टीम
काही वर्षांपूर्वी लोकांचा वाढता कल हा व्हॉट्सअॅप आणि फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडे होता. सध्याची तरूणाईला इंस्टाग्राम जास्त आवडणारा सोशल मीडिया आहे. इंस्टाग्रामवर भारतात बंद केलेल्या टीकटॉक अॅपप्रमाणे व्हिडीओ बनवता येतात आणि पैसेही कमवता येतात. आता सर्वांकडेच इंस्टाग्राम आहे. इंस्टाग्रामने, रील्स नावाने ओळखले जाणारे एक फिचर सादर केले आहे. रील्स म्हणजे लहान व्हिडीओ. हे व्हिडिओ बर्याच वेळा ट्रेंड करतात आणि व्हिडिओ मेकरला प्रसिद्ध देखील करतात. अशा परिस्थितीत, जर इंस्टाग्रामवर तुमचे रील ट्रेंडिंग करायचे असतील आणि प्रसिद्धी मिळवायची असेल, तर काही सोपे उपाय आहेत.
प्रसिद्धी मिळवण्यासाठी कंटेंटच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे गरजेचे
- रील ट्रेंड करेल की नाही यासाठी कंटेंटच्या गुणवत्तेचे मोठे महत्व आहे.
- कंटेंटची गुणवत्ता खूप महत्त्वाची आहे. तुमच्या कंटेंटचा दर्जा चांगला असण्याचा प्रयत्न करा, तरच त्याला व्ह्यूज आणि लोकप्रियताही मिळेल. रिल्सवर काहीही टाकून प्रसिद्ध होऊ शकत नाही.
सातत्याची काळजी घ्या
- इंस्टाग्रामवर प्रसिद्ध होण्यासाठी, सातत्य असणे आवश्यक आहे. याचा अर्थ असा की प्लॅटफॉर्मवर वेळोवेळी नवीन व्हिडीओ शेअर करत राहावे लागतील.
- जर काही अंतराने व्हिडीओ टाकत राहिल्यास पोहोच लोकांपर्यंत वाढेल आणि तुम्ही लवकरच लोकप्रियही व्हाल.
ट्रेंडिंग विषयांवर लक्ष ठेवणे महत्वाचे
- इंस्टाग्रामवर रील तयार करण्यापूर्वी, विषय योग्यरित्या निवडला आहे याची खात्री करा.
- जर रीलचा विषय चांगला असेल तर तो पटकन ट्रेंड होईल आणि अधिक लोकांपर्यंत पोहोचेल. परंतु, जर विशेष प्रतिभा असेल तर कंटेंट लोकांमध्ये अधिक वेगाने पसरेल.
योग्य टॅग वापरा
- इंस्टाग्रामवर रील्स तयार केल्यानंतर, ते अपलोड करताना योग्य टॅग वापरणे खूप महत्वाचे आहे.
- टॅग वापरताना लक्षात ठेवा की कोणतीही चूक होऊ नये.
- इंस्टाग्रामचे अल्गोरिदम टॅगवर खूप लक्ष ठेवते आणि योग्य टॅग टाकल्यानंतर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते.
चांगले सादरीकरण
इंस्टाग्रामवर रील तयार करताना, तुमच्या व्हिडिओची गुणवत्ता, पार्श्वसंगीत आणि आजूबाजूचे वातावरण देखील लक्षात ठेवा. जर तुमचे प्रेझेंटेशन चांगले नसेल तर लोक त्या व्हिडीओवर जास्त काळ टिकत नाहीत आणि तुमचा रील शेअरही करणार नाहीत.