Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जाणं विदर्भातील साईभक्तांसाठी लवकरच होणार सोपं!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Balasahebh Thackeray Samriddhi mahamarg

मुक्तपीठ टीम

साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जाणं आता विदर्भातील साईभक्तांसाठी अगदीच सोपं जाणार आहे. वेळ तेवढाच कमी जेवढा मुंबईकर साईभक्तांना लागतो. त्याचं कारण मुंबई ते नागपूर असणाऱ्या हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा लवकरच सुरु होतोय.

अखेर प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर समृद्धी महामार्गाच्या एका टप्प्याचा उद्घाटनाचा शुभ मुहूर्त निघाला आहे. येत्या १५ ऑगस्टपासून शिर्डी ते नागपूरदरम्यान वाहतूक सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. याचा सर्वात मोठा फायदा व्यापारी, व्यावसायिक, कारखानदार, शेतकरी यांच्याप्रमाणेच सर्वात जास्त होणार आहे, तो नागपूर आणि विदर्भातील साईबाबांच्या भक्तांना.

मुंबई ते नागपूर दरम्यान बांधण्यात येत असलेला हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा विकासाचा सुपर हायवे मानला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून काम सुरु असलेल्या या महामार्गामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना वेगवान वाहतुकीची सोय मिळणार आहे. मुंबई ते नागपूर दरम्यानच्या देशातील सर्वात हायटेक महामार्गाचे सुमारे ८५ टक्के काम आतापर्यंत झाले आहे. आतापर्यंत शिर्डी ते नागपूर दरम्यान या महामार्गाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. लवकरच पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डी दरम्यान हा महामार्ग खुला होणार आहे. पुढील वर्षभरात संपूर्ण महामार्ग खुला करण्याची सरकारची योजना आहे.

पुढील वर्षी संपूर्ण महामार्ग सुरू करण्यात येणार

  • १७०१ किमी लांबीच्या महामार्गाचे सुमारे ८० टक्के नागरी काम पूर्ण झाले आहे.
  • नागपूर ते मुंबई दरम्यानचा महामार्ग तीन टप्प्यात सुरू करण्यात येणार आहे.
  • पहिला टप्पा ऑगस्ट २०२२ मध्ये आणि संपूर्ण मार्ग २०२३ मध्ये खुला केला जाईल.
  • पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डी असा ५२० किमी लांबीचा महामार्ग खुला करण्यात येणार आहे.
  • वर्षअखेरीस दुसऱ्या टप्प्यात ६२३ किमीचा महामार्ग सुरू करण्यात येणार आहे.
  • तो नागपूर ते इगतपुरी हा महामार्ग असेल.

समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये…

  • समृद्धी महामार्ग हा देशातील पहिला सर्वात लांब महामार्ग आहे, ज्याच्या दोन्ही बाजूला सुरक्षा भिंती असतील.
  • ७०० किमी महामार्गावर १४०० किमी सुरक्षा भिंतीचे काम सुरू आहे.
  • इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठीही विशेष काळजी घेण्यात आली आहे.
  • महामार्गाच्या दोन्ही बाजूला प्रत्येक ४० ते ५० किमी अंतरावर वाहने चार्ज करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
  • देशातील सर्वात आधुनिक टोल प्रणाली समृद्धी महामार्गावर वापरली जाणार आहे.
  • याअंतर्गत वाहनचालकांनी जेवढा प्रवास केला तेवढाच टोल भरावा लागणार आहे.
  • नवीन तंत्रज्ञानाअंतर्गत, वाहनचालकांनी एंट्री पॉइंटऐवजी महामार्गावरून बाहेर पडल्यावर टोल आकारला जाईल.

पाहा:


Tags: BalaSahebh Thackeray samruddhi mahamarggood newsGood news Morningmumbainagpurshirdiगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंगनागपूरमुंबईशिर्डीहिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग
Previous Post

राज्यात २,०१५ नवे रुग्ण, तर १,९१६ रुग्ण बरे! पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ६०८ नवे रुग्ण!!

Next Post

इंस्टाग्रामवर स्टार कसं बनायचं? रील्स तयार ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, फॉलोअर्स वाढवा!

Next Post
instagram reels

इंस्टाग्रामवर स्टार कसं बनायचं? रील्स तयार 'या' गोष्टी लक्षात ठेवा, फॉलोअर्स वाढवा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!