मुक्तपीठ टीम
ड्रोन म्हटलं की आता फक्त छायाचित्रण उरलेले नाही. तसं इवलंसं असणारं ड्रोन आता बहुउपयोगी झालं आहे. छायाचित्रणातून एक वेगली बर्ड आय व्ह्यू अनुभुती देतानाच शेती, सुरक्षा आणि इतर अनेक बाबतीत ड्रोनचा फायद्याचा ठरत आहे. आता सरकारने ड्रोन आणि संबंधिचत घटक बनवणाऱ्या स्वदेशी उत्पादकांसाठी पीएलआय योजना लागू केली आहे. या योजनेमुळे स्वदेशी उत्पादन कऱणाऱ्या कंपन्यांना प्रत्येक वर्षी त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीवर आधारीत प्रोत्साहन लाभ मिळतो. केंद्र सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने ड्रोन आणि ड्रोन घटकांकरिता उत्पादन सलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजनेसाठी अर्ज मागवले आहेत.
ड्रोन उत्पादकांनी कसा घ्यायचा लाभ?
- वित्तीय वर्ष २०२१- २०२२ करिता पीएलआयसाठीच्या पात्रतेची पूर्तता करणाऱ्या कंपन्या अर्ज करु शकतात.
- अर्ज सादर करण्याची अतिंम तारीख २० मे २०२२ आहे
- संपूर्ण वित्तीय वर्षासाठी (१ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२) पीएलआय साठीच्या पात्रतेची पूर्तता केलेल्या ड्रोन आणि ड्रोन घटक उद्योगांकडून नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने अर्ज मागवले आहेत.
- असे उत्पादक/उद्योग आपले अर्ज https://www.civilaviation.gov.in/application-pli-scheme इथे सादर करु शकतात.
- मंत्रालयाचा ४ मे २०२२ रोजीचा आदेश इथे उपलब्ध आहे : https://www.civilaviation.gov.in/sites/default/files/Application%20for%20PLI%20scheme%20for%20drones%20and%20drone%20components.pdf
२० मे रोजी अखेरचा दिवस
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २० मे २०२२ असून २३.५९ वाजेपर्यंत अर्ज सादर करता येतील. लाभार्थ्यांच्या अर्थ विषयक कागदपत्रे आणि इतर दस्तावेजांची तपशीलवार छाननी झाल्यानंतर पीएलआय लाभार्थ्यांची अंतिम यादी ३० जून २०२२ पर्यंत जारी होणे अपेक्षित आहे.
यापूर्वी २० एप्रिल २०२२ रोजी, मंत्रालयाने दहा महिन्यांच्या कालावधीसाठी (१ एप्रिल २०२१ ते ३१ जानेवारी २०२२) पीएलआय अर्जदारांनी सादर केलेल्या अर्थ विषयक कागदपत्रांवर आधारित १४ पीएलआय लाभार्थ्यांची तात्पुरती यादी प्रकाशित केली आहे. यामध्ये पाच ड्रोन उत्पादक आणि नऊ ड्रोन घटक उत्पादकांचा समावेश आहे. २० एप्रिल रोजीचा मंत्रालयाचा आदेश इथे उपलब्ध आहे: https://www.civilaviation.gov.in/sites/default/files/Public%20Notic.pdf
ड्रोन आणि ड्रोन घटकांसाठीच्या पीएलआय योजनेच्या पात्रता निकषांमध्ये ड्रोन कंपन्यांसाठी २ कोटी रुपये आणि ड्रोन घटक उत्पादकांसाठी ५० लाख रुपये वार्षिक विक्री उलाढाल समाविष्ट आहे; आणि मूल्यवर्धन, विक्री उलाढालीच्या ४०% पेक्षा जास्त असावे.
ड्रोन आणि ड्रोन घटकांसाठी पीएलआय योजना ३० सप्टेंबर २०२१ रोजी अधिसूचित करण्यात आली. ड्रोन आणि ड्रोन घटकांसाठी पीएलआय योजना येथे आहे:
https://egazette.nic.in/WriteReadData/2021/230076.pdf
पाहा व्हिडीओ: