मुक्तपीठ टीम
शिवसेनेतील बंडानंतर अनेक आमदार, खासदार आणि नगरेसवक शिंदे गटात सामील झाले आहेत. रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम हे देखिल शिंदे गटात गेले. अशा प्रसंगी रामदास कदम यांचे दुसरे सुपुत्र सिद्धेश रामदास कदम अजूनही युवासेनेच्या कोअर कमिटी कार्यकारणीत कसे आहेत? असा प्रश्न युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांना विचारण्यात आल्यानंतर काही काळ वातावरण तापले होते.
सिद्धेश रामदास कदम अजुनही युवासेना कोअर कमिटीत कसे?
- मुंबईत विभाग प्रमुख आणि सचिवांची सोमवारी बैठक पार पडली.
- दसरा मेळावा पूर्व तयारीसाठी महत्त्वाची बैठक झाली.
- या बैठकीला शिवसेना नेते विनायक राऊत, अनिल देसाई आणि मुंबईतील सर्व विभाग प्रमुख तसेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि शिवसेना सचिव सूरज चव्हाण उपस्थित होते.
- याच बैठकीत रामदास कदम यांचे दुसरे पुत्र सिद्धेश कदम शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेत अजून कसे काय कार्यरत आहेत? त्यांची हाकालपट्टी अजून का केली नाही..? असे प्रश्नं विभाग प्रमुख सुधाकर सुर्वे आणि विलास पोतनीस यांनी उपस्थित केला.
- सिद्धेश कदम अजूनही युवा सेनेच्या पदावर असून ते विभागात वावरत आहेत, असा आरोप सुर्वे आणि विलास पोतनीस यांनी केला.
शिवसेनेच्या बैठकीत वाद-
- शिवसेना नेते अनिल देसाई आणि विनायक राऊत यांनीही आश्चर्य व्यक्तं करत युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांना प्रश्न विचारला.
- यावर वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांनी यावर लवकरच निर्णय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारून घेऊ असे उत्तर दिले. हे उत्तर एकूण उपस्थित विभाग प्रमुख चांगलेच भडकले.
- पक्षाचे सचिव आणि खासदार विनायक राऊत आणि अनिल देसाई यांनी हा वाद मिटवताना सुधाकर सुर्वे आणि विलास पोतनीस यांना पाठिंबा दिला.
- तर वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांच्याकडे या मुद्यावर नव्हते समाधानकारक उत्तर नसल्याचीही माहिती समोर आलीय.