मुक्तपीठ टीम
परफेक्ट कॉमिक टायमिंग, कॉमेडी आणि अॅक्शनसाठी ओळखला जाणारा बॉलिवूडचा सुपरस्टार म्हणजे गोविंदा. या अभिनेत्याचे सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोइंग आहे, जे त्याची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात. आज त्याचा ५९ वा वाढदिवस आहे. या अभिनेत्याने चित्रपटसृष्टीत एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याचा संघर्ष काही सोपा नव्हता. त्याने चित्रपटात येण्यापुर्वी खूप मेहनत केली आहे, तो या शिखरावर कसा पोहोचला ते नक्की वाचा…
एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट आणि गाणी…
- गोविंदाने १९८६ मध्ये आलेल्या इलजाम या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
- काही चित्रपटांनंतर, गोविंदाने कॉमेडी चित्रपटांमध्ये प्रवेश केला.
- कुली नंबर १, अनारी नंबर १, बडे मियाँ छोटे मियाँ, हद कर दी आपने, पार्टनर सारख्या हिट चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे.
- गोविंदाने अनेक पुरस्कारही जिंकले आहेत.
- तो अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत दिसला आणि चाहत्यांच्या पसंतीस उतरला.
- त्याच्या उत्कृष्ट अभिनय कौशल्याव्यतिरिक्त, गोविंदाकडे काही मस्त आणि वेडे नृत्य कौशल्य देखील होते.
- त्याची गाणी ते सिद्ध करतात.
- त्याला इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट नर्तकांपैकी एक मानले जाते.
- त्यांने दुल्हे राजा, आंखियों से गोली मारे, किसी डिस्को में जाये, हसन है सुहाना, सोनी दे नखरे, मैं तो रास्ते से जा रहा था अशी अनेक गाणी गाजवली आहेत.
विरारचा ‘गल्ली बॉय’ बॉलिवूडचा सुपरस्टार कसा झाला?
- स्ट्रगलच्या दिवसात गोविंदाकडे राहण्यासाठी घर नव्हते.
- तो विरारला चाळीत राहत असे.
- त्याला विरारचा ‘गल्ली बॉय’ असे नाव पडले होते.
- इथे राहून तो आपल्या मामासाठी ऑडिशन देत असे.
- एकदा तो एका पानाच्या दुकानात उभा असताना बीआर चोप्रा कॅम्पच्या महाव्यवस्थापकाची त्याच्यावर नजर पडली आणि त्यांनी गोविंदाला ऑफिसमध्ये नेले.
- तिथे त्याला अभिनय करायला लावला आणि एका टेकमध्ये त्यांनी त्याला ओके केले.
- आता गोविंदाची एकूण संपत्ती १७० कोटी रुपये आहे.
- त्याचे वार्षिक उत्पन्न १०-१२ कोटी रुपये आहे.
- तो एका चित्रपटासाठी ५-६ कोटी रुपये घेतो.
- तो जाहिरातीच्या माध्यमातून त्याचे २ कोटी रुपये उत्पन्न येते.
- गोविंदाचा एक आलिशान बंगला आहे.
- ज्याची किंमत १६ कोटी आहे.
- मुंबईतील जुहू आणि मध बेटावरही त्याची मालमत्ता आहे.
फक्त अभिनयाची नाही तर, महागड्या गाडींचीही आवड…
- गोविंदाला महागड्या गाड्यांची खूप आवड आहे.
- त्याच्याकडे १५ लाख रुपयांची ह्युंदाई क्रेटा, ३४ लाख रुपयांची टोयोटा फॉर्च्युनर आणि ३६ लाख रुपयांची फोर्ड एंडेव्हर आहे.
- गोविंदाकडे काही हाय-एंड लक्झरी कार देखील आहेत.
- मर्सिडीज C220D ज्याची किंमत आहे ४३ लाख रुपये आणि मर्सिडीज बेंझ जीएलसी ज्याची किंमत ६४ लाख रुपये आहे.