Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हॉटेल, हॉस्पिटल्स आणि लसीकरण! देशभर लसीकरण पॅकेजच्या पंचतारांकित ऑफर!

केंद्र सरकारचे राज्यांना कारवाईचे आदेश

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
hotel package (2)

मुक्तपीठ टीम

देशात कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरण मोहीम ही खूप धीम्या गतीने पार पाडली जात आहे. अशातच देशातील काही पंच तारांकित हॉटेल्सनी खाजगी हॉस्पिटल्सच्या सहकार्याने लसीकरण पॅकेज द्यायला सुरूवात केली आहे. त्यामुळे केंद्राने अशी हॉस्पिटल्स आणि हॉटेलांवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारांना दिले आहेत.

 

“हॉटेल, हॉस्पिटल आणि लसीकरण!”

  • देशाच्या मुंबई, हैदराबादसह काही महानगरांमधील काही पंचतारांकित हॉटेलनी खासगी हॉस्पिटल्सशी करार करुन असे पॅकेज ऑफर केले आहेत.
  • या पॅकेजमध्ये लसीकरणाचा खर्च, ब्रेकफास्ट, डिनर आणि हॉटेलमध्ये मुक्काम यांचा समावेश आहे.
  • यासोबतच जर ग्राहकांना पाहिजे असेल तर आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्लाही देण्याची अतिरिक्त सोय उपलब्ध आहे.

लसीकरण पॅकेज म्हणजे लसीकरण तत्वांचे उल्लंघन

  • सरकारने घालून दिलेल्या मार्गदर्शन तत्वांचे हे उल्लंघन आहे.
  • सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्राने पत्रं लिहिले आहे.
  • काही खासगी हॉस्पिटल्स आणि हॉटेल्स एकत्रित मिळून लसीकरणाचे पॅकेज देत असल्याची बाब आरोग्य मंत्रालयाच्या निदर्शनास आल्याचे अवर सचिव मनोहर अगनानी यांनी सांगितले आहे.
  • हा प्रकार म्हणजे नॅशनल कोविड व्हॅक्सिनेशन प्रोग्रामच्या मार्गदर्शन तत्वांचे उल्लंघन आहे.
  • हा प्रकार तात्काळ बंद झाला पाहिजे, असं या पत्रातून नमूद करण्यात आले आहे. संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

 

पत्रात अग्निनी यांनी लिहिले आहे की राष्ट्रीय कोरोना लसीकरण कार्यक्रमांतर्गत सरकारी कोरोना लसीकरण केंद्र आणि खाजगी कोरोना लसीकरण केंद्र, कार्यालय, बुजुर्ग आणि दिव्यांगांसाठी ग्रुप हौसिंग सोसायटी वगळता इतर कोणत्याही ठिकाणी लसीकरण करता येणार नाही. म्हणून हॉटेल्समध्ये लसीकरण या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात आहे आणि त्वरित थांबवावे.

 

hotel package (1)


Tags: hospitalHotelvaccinationलसीकरणहॉटेलहॉस्पिटल
Previous Post

कोरोना सेंटरमध्ये सुपरवायझर भासवून अभिनेत्रीला लस! बनावट ओळखपत्राचाही वापर!

Next Post

मुंबईत लसीकरणाचं पंचतारांकित पॅकेज, पण लस ठेवण्यासाठी साध्या फ्रिजचा वापर!

Next Post
the lalit

मुंबईत लसीकरणाचं पंचतारांकित पॅकेज, पण लस ठेवण्यासाठी साध्या फ्रिजचा वापर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!