Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ललिता व डाॅ. श्रीपाल सबनीस यांना राष्ट्रीय ‘सावित्रीजोती’ पुरस्कार

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेतर्फे २७ नोव्हेंबर रोजी पुरस्कार वितरण

November 13, 2021
in घडलं-बिघडलं
0
Shripal Sabins, Lalita Sabnis,

मुक्तपीठ टीम 

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेच्या वतीने दिला जाणारा पहिलाच राष्ट्रीय सावित्रीजोती पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री ललिता आणि ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. श्रीपाल सबनीस यांना जाहीर करण्यात आला आहे. सत्यशोधकी पगडी, प्रबोधनाची लेखणी, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. बंधुता प्रकाशनच्या संचालिका मंदाकिनी रोकडे यांच्यासह विविध क्षेत्रातील १५ महिलांना ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.

Shripal Sabins, Lalita Sabnis, Mandakini Rokade

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या सहयोगाने येत्या २७ नोव्हेंबर २०२१ रोजी पत्रकार भवनमध्ये होणाऱ्या सोहळ्यात माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते सबनीस दाम्पत्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल, अशी माहिती साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली. या सोहळ्याला डॉ. विजय ताम्हाणे, कवी चंद्रकांत वानखेडे, प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, प्रा. डॉ. संजय नगरकर, प्रा. प्रशांत रोकडे उपस्थित राहणार आहेत.

 

मंदाकिनी रोकडे यांच्यासह वैशाली मोहिते (पुणे), मधुराणी बनसोड (वाशीम), शिल्पा परुळेकर (वसई), अक्षदा देशपांडे (मुंबई), दीपिका सुतार (सिंधुदुर्ग), चंदना सोमाणी (पुणे), माधुरी चौधरी (औरंगाबाद), शरयू पवार (पुणे), जयश्री पाटकर (अमरावती), सरिता पवार (सिंधुदुर्ग), डॉ. नीलम जेजुरकर (राजगुरूनगर), डॉ. सुनीता खेडकर (पुणे), पौर्णिमा खांबेटे (पुणे), मनीषा शिंदे पाटील (पलूस, सांगली) यांना ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ प्रदान करण्यात येईल.

 

डाॅ. सबनीस यांनी ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, २० व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आणि इतरही महत्वपूर्ण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. ललिता सबनीस यांच्या मनस्पंदन, रमाबाई, सुखाच्या शोधात या साहित्यकृती प्रकाशित झाल्या आहेत. डाॅ. सबनीस यांनी आपल्या वाणी आणि लेखणीतून सातत्याने परखडपणे व्यक्त केलेल्या सत्यशोधकी आणि पुरोगामी विचारांचा हा सन्मान आहे, असे रोकडे यांनी सांगितले.


Tags: Dr. Shripal Sabnislalita SabnisMandakini RokdeRashtriya Bandhuta Sahitya Parishadडाॅ. श्रीपाल सबनीसमंदाकिनी रोकडेराष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदललिता सबनीस
Previous Post

नोकरदार मागासवर्गीय महिलांना मुंबईतील बोरिवलीत वसतीगृह प्रवेशाची संधी

Next Post

झुंडगिरी ठेचून काढा! कंगनाचा सडका मेंदू, खुर्शिदांचे सुलेमानी किडे ते रस्त्यावरील दंगलखोर! प्रवृत्ती एकच!

Next Post
Kangana Salman mob

झुंडगिरी ठेचून काढा! कंगनाचा सडका मेंदू, खुर्शिदांचे सुलेमानी किडे ते रस्त्यावरील दंगलखोर! प्रवृत्ती एकच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!