मुक्तपीठ टीम
मोटर विश्वातील होंडा आणि बँक ऑफ महाराष्ट्र मैत्रीची. हे दोन दिग्गज एकत्र आल्याने आलिशान गाड्यांच्या शौकिंनांसाठी नव्या कारचा मार्ग आता सोपा झाला आहे. होंडा अमेज, होंडा जेझ, होंडा डब्लु आर- वी आणि होंडा सिटीच्या खरेदीवर कमी व्याजदरासह उत्तम कार फायनान्स योजनांचा आणि कर्जाचा लाभ मिळेल.
बँक ऑफ महाराष्ट्रसोबत भागीदारीचे फायदे
- कर्मचारी, स्वयंरोजगार, व्यावसायिक, व्यापारी किंवा शेतकरी अशा विविध उत्पन्न गटातील ग्राहकांना बँक ऑफ महाराष्ट्रच्या सर्वात खास उत्पादन “महा सुपर कार कर्ज” चा लाभ मिळेल.
- कॉर्पोरेट ग्राहक म्हणून नोंदणीकृत कंपन्यांसाठी वाहनाच्या किमतीत ८० टक्क्यांपर्यंतचे कर्ज देखील उपलब्ध असेल.
- धारक आणि विद्यमान गृहकर्ज ग्राहकांसाठी ROI सवलत, शून्य प्रक्रिया शुल्क, शून्य प्री/पार्ट पेमेंट फी इत्यादींचा समावेश आहे.
- मुख्य फायद्यांमध्ये वाहनाच्या किमतीच्या ९०% पर्यंत वित्तपुरवठा, ७.०५ टक्क्यांपासून सुरू होणारे कमी व्याज , ४८ तासांच्या टर्न-अराउंड-टाइम, कॉर्पोरेट वेतन खाते यांचा समावेश आहे.
ग्राहक या सणासुदीच्या हंगामात त्यांची बहुप्रतिक्षित ड्रीम कार खरेदी करू शकतात. महाराष्ट्राचे विशाल बँकिंग नेटवर्क आणि होंडाच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाखालील उत्पादन श्रेणी, ही भागीदारी परस्परांना लाभदायक ठरेल आणि बाजारपेठेत सखोल प्रवेश निर्माण करेल.
भागीदारीबद्दल भाष्य करताना, राजेश गोयल, वरिष्ठ उपाध्यक्ष आणि संचालक – विपणन आणि विक्री, होंडा कार्स इंडिया लिमिटेड यांनी स्पष्ट केले की “बँक ऑफ महाराष्ट्रसोबतची ही भागीदारी आमच्या ग्राहकांना परवडणारी आणि सुलभ वाहतूक व्यवस्था प्रदान करण्याच्या आमच्या प्रयत्नांना पूरक आहे.” कमी व्याजदराचा आणि कार फायनान्सचा ग्राहकांनी नक्की अनुभव घ्यावा.
या भागीदारीबाबत बोलताना बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए.एस. राजीव यांनी स्पष्ट केले की, “होंडा कार्स कंपनीशी निगडीत असणे खरोखरच खूप छान आहे. आम्ही शून्य प्रक्रिया शुल्कासह अतिशय आकर्षक किमतीत कार कर्ज ऑफर करतो, त्यामुळे आमच्या ग्राहकांसाठी ते खूप फायदेशीर ठरेल. यामुळे आमच्या ग्राहकांना समाधान मिळेल. ग्राहकांना, तसेच सणासुदीच्या काळात आनंद मिळेल.”
बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक हेमंत टमटा यांनी स्पष्ट केले की, “होंडा कंपनीसोबत भागीदारी करणे आमच्यासाठी खरोखरच खूप आनंददायी आहे. होंडा कार्स ही भारतातील आघाडीच्या कार उत्पादकांपैकी एक आहे जी मोठ्या प्रमाणात आणि विशिष्ट ग्राहकांसाठी वाहने तयार करते. आमच्या ग्राहकांना सणासुदीचा आनंद लुटण्याची संधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र कार कर्ज हे सर्वात परवडणारे आहे, कार कर्ज शून्य प्रक्रिया शुल्कासह येते.”
एनबीएफसी सारख्या अनेक फायनान्सर्स आणि पीएसयु बँक सोबत भागीदारी केली आहे. शहरी बाजारांव्यतिरिक्त निमशहरी आणि ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करून, एचसीआयएल या सणासुदीच्या काळात आपल्या ग्राहकांसाठी खरेदी अधिक आकर्षक आणि फायदेशीर बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यानी त्यांच्या ग्राहकांसाठी कार खरेदीचा अनुभव आणखी वाढेल.