मुक्तपीठ टीम
भारतात स्कूटर म्हटलं की, आपोआप सर्वांच्या नजरेत अॅक्टिव्हा येते. देशातील सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर म्हणजे अॅक्टिव्हा आहे. लवकरच आता अॅक्टिव्हाचा इलेक्ट्रिक व्हर्जन लॉंच होणार आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉंच होण्याची शक्यता आहे. ही स्कूटर आघाडीच्या इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा करेल. या इलेक्ट्रिक स्कूटरचा लूक मॅक्सी स्कूटरसारखा असेल आणि ती दिसायलाही थोडी मोठी असेल. होन्डा अॅक्टिव्हासह, कंपनी इलेक्ट्रिक स्कूटरच्या रेंजमध्ये आणखी १० मॉडेल्स सादर करण्याची तयारी करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, होन्डा अॅक्टिव्हा २०२४ च्या शेवटी आणि २०२५ च्या सुरुवातीला भारतात लॉंच होईल. तसेच, होन्डा च्या श्रेणीतील अॅक्टिव्हा ही एकमेव स्कूटर नसेल जी कंपनी इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये ऑफर करेल.
होन्डा अॅक्टिव्हा इलेक्ट्रिक स्कूटरचे आधुनिक आणि आकर्षक फिचर्स
- होन्डा अॅक्टिव्हा इलेक्ट्रिक स्कूटरच्या डिझाईनबद्दल सांगायचे तर, त्याची रचना अगदी मॅक्सी स्कूटरसारखी असू शकते.
- कंपनी या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक जबरदस्त फिचर्स देखील देणार आहे.
- या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये इंडिकेटर माउंटेड फ्रंट अॅप्रन, फ्लॅट सीट, सिल्व्हर कलर ग्रॅब रेल, सीटखाली काढता येईल अशा पद्धतीच्या बॅटरीसारखे फिचर्स दिले जाऊ शकतात.
- कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अंडरबोन फ्रेमचा वापर केला आहे.
होन्डा अॅक्टिव्हा इलेक्ट्रॉनिक स्कूटर तंत्रज्ञानाच्या बाबतीत फर्स्ट क्लास आहे. कंपनी या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान वापरू शकते. या इलेक्ट्रिक स्कूटरद्वारे कंपनी आपल्या ग्राहकांना भाड्याने बॅटरी घेण्याची सुविधा देखील देऊ शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात ही इलेक्ट्रिक स्कूटर वेगवेगळ्या किंमती आणि बॉडी डिझाइनसह ऑफर केली जाऊ शकते. होन्डाने बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान स्थापित करण्यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसह भागीदारी केली आहे अशी माहिती समोर येत आहे.