मुक्तपीठ टीम
दरवर्षी लाखो लोक रस्ते अपघातांना बळी पडतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यूही होतो. सरकारही होणाऱ्या अपघातांवर सुरक्षा योजनांचा विचार करत असून यात सातत्याने सुधारणा केल्या जात आहेत. या गोष्टी लक्षात घेऊन दुचाकी उत्पादक कंपनी स्कूटरमध्ये एअरबॅगसारखे सुरक्षा फिचर्स आणण्याचे काम करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जपानी टू व्हीलर निर्माता कंपनी होंडा आपल्या स्कूटरमध्ये एअरबॅग्ज आणू शकते. कंपनीने यासाठी नुकताच अर्जही केला आहे.
स्कूटरमध्ये एअरबॅग कुठे असेल?
- एअरबॅग स्कूटरच्या अगदी मध्यभागी लावली जाऊ शकते. . हँडलच्या मधोमध असल्याने एअरबॅगमुळे अपघात झाल्यास चालकाला सुरक्षित ठेवण्यास मदत होईल.
- हे कारमध्ये आढळणाऱ्या एअरबॅग्सप्रमाणे काम करेल परंतु कारमधील सिस्टमपेक्षा वेगळे असेल.
होंडाने २००९मध्ये थायलंड आणि जपानमध्ये स्कूटर लॉंच केली होती. पीसीएक्स नावाच्या या स्कूटरमध्ये एअरबॅगचा पर्याय देण्यात आला होता. आता कंपनी पुन्हा एकदा एअरबॅगसह ही स्कूटर लॉंच करू शकते.
बाइकमध्येही एअरबॅग देण्याची शक्यता!
- काही देशांमध्ये बाईकवर एअरबॅगची चाचणी देखील करण्यात आली आहे.
- अशा स्थितीत स्कूटरशिवाय बाइकमध्ये एअरबॅगही बसवण्याची योजना असू शकते.
वाहन उत्पादकाने वाहनामध्ये स्थापित केलेली कोणतीही नवीन प्रणाली किंमतींमध्ये फरक करते. अलीकडे कारमध्ये किमान सहा एअरबॅग अनिवार्य करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पण त्यामुळे किंमतीत फरक पडेल असे वाहन उत्पादकांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे स्कूटरमध्ये एअरबॅग्ज बसवल्यास दुचाकींच्या किंमती नक्कीच वाढतील पण त्यामुळे सुरक्षितताही मिळेल.