मुक्तपीठ टीम
“गर फिरदौस बर रूये ज़मी अस्त/ हमी अस्तो हमी अस्तो हमी अस्त”…धरतीवर कुठे स्वर्ग आहे तो इथंच आहे. इथंच आहे. इथंच आहे. जे न पाहे रवी ते पाहे कवी, असं आपण कवींबद्दल बोलतो खरं, पण काश्मीरबद्दल कवीच्या ओळी खरंच आहेत. कश्मीर आहेच स्वर्ग. आता या स्वर्गात होम स्टेद्वारे पर्यटकांना गावांची वैशिष्ट्ये, सांस्कृतिक विविधता, स्थानिक मूल्ये आणि परंपरा यांची ओळख करून दिली जाईल.
राज्यातील खेड्यापाड्यात जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधा उपलब्ध होणार असून, त्यासाठी जगातील प्रगतीशील प्रवासी कंपनी ओयोने जम्मू-काश्मीर सरकारसोबत करार केला आहे. या वर्षाअखेर गावांमध्ये पर्यटकांसाठी २०० घरं तयार करण्यात येणार आहेत. यासाठी राज्य सरकार मिशन यूथ अंतर्गत ५०० तरुणांना ५०-५० हजारांची आर्थिक मदत करणार आहे. घर तयार झाल्यानंतर ते ओयो ग्रुपच्या प्लॅटफॉर्मवर असेल आणि तेथून बुकिंग करता येईल.
J&K Government & world’s leading travel tech platform, OYO Group @oyorooms launched rural home stay under project “Crown of Incredible India” to encourage micro-entrepreneurs in the villages. It will revitalize local art & crafts and redevelopment of rural areas. pic.twitter.com/Ie41N3htHw
— Office of LG J&K (@OfficeOfLGJandK) February 10, 2022
होम स्टे प्रकल्पासाठी ओयोचे खास नियोजन
- जम्मू आणि काश्मीर सरकार आणि ओयो ग्रुपने अतुल्य भारताच्या ताज प्रकल्पांतर्गत ग्रामीण होम स्टे योजना सुरू केली.
- लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा म्हणाले की, ओयो ग्रुपसह सरकार ग्रामीण भागात सूक्ष्म उद्योगांना चालना देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करत आहे.
- यामुळे ग्रामीण भागातील स्थानिक कला आणि हस्तकलेचे पुनरुज्जीवन आणि ग्रामीण भागाच्या पुनर्विकासाचा मार्ग खुला होईल.
- निसर्गाने जम्मू-काश्मीरला अफाट नैसर्गिक सौंदर्य दिले आहे. त्यामुळे ही योजना आखण्यात आली आहे.
- या योजनेमुळे देशी-विदेशी पर्यटकांना ग्रामीण भागातील संस्कृती, स्थानिक खाद्यपदार्थ, परंपरा आणि मैत्रीपूर्ण वर्तनाची ओळख करून घेता येणार असून, पर्यटकांसाठी हा एक अनोखा अनुभव असेल.
- हे स्थानिक समुदाय, तरुण आणि महिलांचे सक्षमीकरण करून आणि स्थानिक उत्पादनांना चालना देऊन गरिबीचे निर्मूलन करण्यास मदत करेल.
लेफ्टनंट गव्हर्नर म्हणाले की, “ग्रामीण भागांना उत्तम रस्ते, वीज-पाणी आणि मोबाईल इंटरनेटने जोडण्याच्या दिशेने सरकारने महत्त्वाची पावले उचलली असून ही योजना पूर्ण झाल्यावर देशी-विदेशी पर्यटकांना गावांमध्ये राहून जागतिक सेवांचा आनंद घेता येणार आहे.”
पहलगाममध्ये पहिल्यांदा ओयोचा यशस्वी प्रयोग
- ग्रामीण भागातील खासगी घरात राहून देशी-विदेशी पर्यटकांना वेगळा आदरातिथ्य अनुभवता यावे यासाठी ओयो ग्रुपने पहलगाममध्ये होम स्टेबाबत यशस्वी प्रयोग केला आहे.
- कंपनीने पहलगाममध्ये होम स्टेसाठी २० करार केले आहेत.
- सध्या ओयो प्लॅटफॉर्मवर १० होम स्टे डेस्टिनेशन्स आहेत. कार्यक्रमाला उपस्थित असलेले ओयो ग्रुपचे संस्थापक आणि सीईओ रितेश अग्रवाल यांनी ही माहिती दिली.
- या प्रकल्पाच्या मदतीने, ओयो उधमपूर, दोडा, पहलगाम आणि कोकरनाथ सारख्या भागात पर्यटनाच्या चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करेल.