मुक्तपीठ टीम
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील कारमध्ये सापडलेल्या स्फोटके प्रकरणानंतर घडलेले मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे अटकेमुळे राज्याचे गृहखाते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. विरोघकांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. या प्रकरणावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने भाजप करत आहे. त्यातचं आज गृहमंत्री देशमुख यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
शरद पवार यांच्या सहा जनपथ या दिल्लीतील बंगल्यावर गृहमंत्री अनिल देशमुख सकाळी दहा वाजताच्या सुमारास दाखल झाले. शरद पवार अधिवेशनासाठी सध्या राजधानी दिल्लीत आहेत. संसदेतून परतल्यानंतर शरद पवारांची अनिल देशमुखांनी भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.
अनिल देशमुखांना अभय
- सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्यासाठी विरोधकांकडून दबाव वाढत आहे.
- मात्र, सध्या तरी अनिल देशमुख यांना अभय मिळाले आहे. मात्र, मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन परमबीर सिंह यांची उचलबांगडी झाली. त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली.
गृहमंत्री अनिल देशमुखांचा कडक पावित्रा
- अंबानी स्फोटक प्रकरणाच्या तपासात आमच्या अधिकाऱ्यांकडून गंभीर चुका झाल्याचे गृहमंत्री देशमुख यांनीही मान्य केले आहे. त्यामुळे आता मुंबईच्या आयुक्तांसह राज्यातील इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या नंतर कसून चौकशी करून पुढची कारवाईही केली जाणार आहे.
- आता अंबानी स्फोटक प्रकरणाचा तपास एटीस आणि एनआयएकडून होत आहे. या चौकशीत जे सत्य समोर येईल त्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
Maharashtra Home Minister #AnilDeshmukh can’t escape his responsibility in #SachinVaze role in #mansukhhiran murder & #AmbaniBombScare #Antillia incident. Anil Deshmukh & CM Uddhav Thackeray both are equally responsible alongwith Parambir Singh @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 18, 2021