Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

होळीला फूल टू फेक: प्रवीण दरेकर हे भाजपाचे नेते नसते, तर किरीट सोमय्या काय बोलले असते?

“दरेकरांशी राऊत, पवारांचं संगनमत, पोलीस काय करणार? आता सीबाआय, ईडी मागे लावतो!” बोलले असते?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, विशेष
0
Kirit Somaiya & Pravin Darekar

तुळशीदास भोईटे / मुक्तपीठ टीम

आता राजकारणात सारं काही शक्य असतं. अनेकदा आजचे मित्र उद्याचे शत्रू आणि उद्याचे शत्रू आजचे मित्र असतात. आता ते सोडा. कारण आता विषय आहे तो भाजपाचे अतिआक्रमक नेते किरीट सोमय्या यांचा. ते भाजपाविरोधातील राजकारण्यांवर पुराव्यांचे गठ्ठे घेवून तुटून पडत असतात. त्यामुळे सध्या गाजणारे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांविषयी त्यांची आतून तगमग होत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेही भाजपात आणि प्रवीण दरेकरही भाजपातच. त्यामुळे ते सध्या बोलूही शकत नाहीत. नारायण राणेंच्याबाबतीत झालं तसंच! किमान दरेकरांचं प्रकरण ताजं ताजं असल्यानं कल्पनाविलास करायला काय हरकत की ते भाजपात नाहीत…

प्रवीण दरेकर भाजपावासी झालेले नसते तर काय बोलले असते किरीट सोमय्या?

आजची पत्रकार परिषद मी नेहमीप्रमाणे आरोप करण्यासाठीच घेतली आहे. हे मी तुम्हाला वेगळे सांगायला नको. पूर्वी मी इतरही काही सामाजिक कार्यांची माहिती घेण्यासाठी पत्रकार परिषद घेत होतो. पण त्याला कोणी विचारायचं नाही. त्यात पुन्हा काहींनी त्याबद्दल पण घोटाळ्यांची कुजबुज सुरु केली. स्वत: काही करत नाहीत, मी केलं तर दुखतं. मी मग तुम्हाला पाहिजे ते घोटाळ्यांचेच फटाके फोडतो. तुम्ही दाखवताच दाखवता. आज मी त्या प्रवीण दरेकरांवर बोलणार आहे.

बाप रे बाप. काय हा माणूस. इंजिनात बसला म्हणजे काय काळं लावून घ्यायचं का कोळशासारखा? अहो याच्याविरोधात आता शेवटी त्यांना एफआयआर घ्यावाच लागला. आला कागदावर ४२०. लागला कलम. हा म्हणे मजूर! याच्याकडे पाहून तुम्हाला वाटते का अशा माणसाने कधी कष्टाची कामे केली असतील. मजुरी केली असेल? पण हा त्या मुंबई बँकेवर मजूर असल्याचं दाखवून निवडून येत होता. त्याच्यावर गुन्हा नोंदवला म्हणून आता ते आघाडीवाले मिरवत आहेत. पण मी सांगतो मुळात यांचाही मोठा घोटाळा आहे. प्रवीण दरेकरने काय पहिल्यांदा निवडणूक लढवली काय? त्यांचा राष्ट्रवादीतील गॉडफादर कोण आहे, ते लोकांना माहित नाही का? एवढी वर्ष कोणामुळे तो मुंबई मुंबई बँकेत सत्ताधारी राहू शकला माहित नाही का?’

उलट या आघाडी सरकारवाल्यांनी या दरेकरांसोबत आता दोन महिन्यांपूर्वी मुंबई बँकेची निवडणूक लढवली. ते संजय राऊतांचे भाऊ, ते राष्ट्रवादीचे लोक सर्व एकत्र लढले. मला सर्व माहित आहे. मी सांगतो, हे सर्व एक आहेत. यांची सर्वांची मिलिभगत आहे. मी तुम्हाला सांगतो, या दरेकरांची सीबीआय चौकशीच लागली पाहिजे. ईडीकडेही मी लवकरच कागदपत्र देणार आहे. असे नाही चालणार. यांना काय वाटते. मी किरीट सोमय्या आहे. सर्व आरोप पुराव्यांसोबतच करतो.

पत्रकार – एक प्रश्न, हे दरेकर तुमच्या पक्षात आले तर…

सोमय्या – आता बघा. मी घोटाळेबाजांबदद्ल बोलतो. आमच्या विवेकानंद गुप्तांनीही या दरेकरांविरोधात किती तक्रारी केल्या माहित आहे का? तेही भाजपावाले मीही भाजपावालाच आहे. त्यांनी जे केले तेच मीही करणार. आम्ही या सर्व भाजपाविरोधातील घोटाळेबाजांविरोधात लढणार म्हणजे लढणार.

आता बसं झालं. मी निघतो.

 

(भांग न घेता संपूर्ण शुद्धीत धुळवडीनिमित्त दिवसाढवळ्या केलेला कल्पनाविलास…हे १०० टक्के काल्पनिक आहे. कुणाला वाईट वाटलं तर वाटू द्या, हा कल्पनाविलासाचा रंग आज एन्जॉय करा.)

मुक्तपीठ – होळीनिमित्त फूल टू फेक बातमीपत्र – धुळवडीनिमित्त कल्पनाविलास:

  • उद्धव ठाकरे फक्त शिवसेना पक्षप्रमुख असते तर… वाचा उद्धव ठाकरेंनी न दिलेली आणि संजय राऊतांनी न घेतलेली रोखठोक मुलाखत…
  • देवेंद्र फडणवीस भाजपा-राकाँपा युतीचे मुख्यमंत्री असते तर…मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांनी विधानसभेत न केलेले स्टिंगचं बिंग फोडणारं भाषण…
  • अजित पवार राज्याचे विरोधी पक्षनेते असते तर…अर्थसंकल्पातील अनर्थ मांडत शिक्षणसेवक, आरोग्यसेवक, अंगणवाडी सेविका, एसटीच्या उपेक्षेवर काय बोलले असते?
  • प्रवीण दरेकर हे भाजपाचे नेते नसते, तर किरीट सोमय्या काय बोलले असते? “दरेकरांशी राऊत, पवारांचं संगनमत, पोलीस काय करणार? आता सीबाआय, ईडी मागे लावतो!” बोलले असते?

सरळस्पष्ट

(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)

संपर्क – 9833794961
ट्विटर @TulsidasBhoite @Muktpeeth

 


Tags: CBIEDHoli Fool to fakeKirit SomaiyaMumbai Bankpravin darekarकिरीट सोमय्याप्रवीण दरेकरमुंबई बँकसीबाआय
Previous Post

होळीला फूल टू फेक: अजित पवार राज्याचे विरोधी पक्षनेते असते तर…

Next Post

आता नवं टेन्शन: तैवानच्या हवाई क्षेत्रात चीनी लढाऊ विमानाची घुसखोरी, एअर डिफेंस मिसाईल्स सज्ज!

Next Post
chinese fighter jet

आता नवं टेन्शन: तैवानच्या हवाई क्षेत्रात चीनी लढाऊ विमानाची घुसखोरी, एअर डिफेंस मिसाईल्स सज्ज!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!