Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता नवं टेन्शन: तैवानच्या हवाई क्षेत्रात चीनी लढाऊ विमानाची घुसखोरी, एअर डिफेंस मिसाईल्स सज्ज!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
chinese fighter jet

मुक्तपीठ टीम

चीनकडून पुन्हा एकदा तैवानच्या हवाई क्षेत्रात घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आलाय. चीनचं एक फायटर जेट तैवानच्या दक्षिण पश्चिम हवाई संरक्षण क्षेत्रात दाखल झाल्याची माहिती मिळतेय. उल्लेखनीय म्हणजे,चीनकडून या महिन्यात बारा वेळा घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आलाय. चीनला प्रत्यूत्तर देताना तैवाननं आपली विमानं धाडली, रेडिओ इशारे दिले तसंच एअर डिफेन्स मिसाईल सिस्टमही तैनात केलं.

 

बीजिंगचा तैवानवर आपला हक्क असल्याचा दावा…

  • एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोनमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक लढाऊ विमानाची माहिती एअर ट्रॅफिक कंट्रोलरद्वारे त्याच्या ओळखीसह प्रदान केली जाते.
  • या महिन्यात आतापर्यंत या संरक्षण क्षेत्रात चीनच्या ३८ विमानांचा मागोवा घेण्यात आला आहे.
  • त्यापैकी जवळपास २६ लढाऊ विमाने, नऊ स्पोर्ट प्लेन आणि तीन हेलिकॉप्टर होते.
  • विशेष म्हणजे, बीजिंग तैवानवर आपला हक्क सांगत आहे.
  • तैवानमध्ये सुमारे अडीच कोटी लोक राहतात.
  • चीन तैवानमध्ये राहणाऱ्या या लोकांना आपले नागरिक मानतो आणि तैवान आपल्या मुख्य भूभागाचा भाग मानतो.
    याबाबत तो खूप आक्रमकही आहे.

 

हिवाळी ऑलिम्पिकदरम्यान चीनकडून हवाई हद्दीचे उल्लंघन झाले नाही…

  • तैवानला त्याच्या मुख्य भूमीशी जोडण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याचे चीनचे अध्यक्ष वारंवार बोलले आहेत.
  • याबाबत त्यांनी थेट धमकीही दिली आहे.
  • बीजिंगमध्ये जोपर्यंत हिवाळी ऑलिम्पिक खेळ सुरू होते, तोपर्यंत चीनच्या लढाऊ विमानांनी एकदाही तैवानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केले नाही, हेही येथे नमूद करणे आवश्यक आहे.
  • परंतु या खेळांच्या समाप्तीपासून, त्याची लढाऊ विमाने दररोज तैवानच्या एअर डिफेन्स झोनमध्ये प्रवेश करत आहेत.

 

सुरक्षेच्या दृष्टीने तैवानचे अनेक धोरणात्मक करार

  • विशेष म्हणजे, तैवान सात दशकांपासून चीनच्या मुख्य भूभाग वेगळे आहे.
  • चीनच्या चुकीच्या कारवाया पाहता, तैवानने आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेक धोरणात्मक करार केले आहेत.
  • यामध्ये अमेरिकेसोबत केलेल्या कराराचा समावेश आहे. चीनकडून तैवानच्या हवाई सीमा उल्लंघनाबाबत अमेरिका सातत्याने चुकीचे चित्रण करत आहे.
  • या मुद्द्यावरून अमेरिका आणि चीन अनेकदा आमनेसामने आले आहेत.
  • एवढेच नाही तर चीनला पाहता अमेरिकेने या भागात आपली विमानवाहू नौकाही तैनात केली आहे.

Tags: AmericachinaTaiwanअमेरिकाचीनतैवानफायटर जेट
Previous Post

होळीला फूल टू फेक: प्रवीण दरेकर हे भाजपाचे नेते नसते, तर किरीट सोमय्या काय बोलले असते?

Next Post

राज्यात १७१ नवे रुग्ण, ३९४ रुग्ण बरे! मुंबई ४८, नाशिक ४, नागपूर ८ नवे रुग्ण !!

Next Post
mcr maharashtra corona report

राज्यात १७१ नवे रुग्ण, ३९४ रुग्ण बरे! मुंबई ४८, नाशिक ४, नागपूर ८ नवे रुग्ण !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!