Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सामान्यांना मूर्ख बनवणारे राजकारणी….काय आहे एक एप्रिलशी संबंध?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
april fool

मुक्तपीठ टीम

कोणालाही मूर्ख बनणे आवडत नाही. बनवणे मात्र आवडतं. त्यातही राजकारण्यांना तर त्यात जास्तच कसब प्राप्त झालेले असते, असे आपण मानतो. त्यांच्याशीही या दिवसाचा संबंध आहेच आहे. एक एप्रिल हा दिवस एप्रिल फूल दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आपण इतरांना मूर्ख बनवून गंमत करण्याचा प्रयत्न सर्वच करतात. आज एक एप्रिलच्या निमित्ताने मुर्खपणाच्या इतिहासाची माहिती:

 

एप्रिल फूलचा इतिहास

एप्रिल फूल दिवस फक्त भारतातच नव्हे तर जगभरात दरवर्षी साजरा केला जातो. बर्‍याच देशांमध्ये हा दिवसदेखील सुट्टीचा असतो. लोक या मजेचा आनंद घेतात..

 

चौदाव्या शतकापासून मुर्खपणाचा इतिहास

असे म्हटले जाते की पहिला एप्रिल फूल दिवस सन १३८१ मध्ये साजरा करण्यात आला. वास्तविक यामागे एक मजेशीर कथा आहे. इंग्लंडचा राजा रिचर्ड आणि बोहेमियाची राणी अ‍ॅनी यांनी त्यांच्या साखरपुड्याची घोषणा केली होती. दिवस जाहीर केला तो ३२ मार्च १३८१ हा. लोक खूप आनंदित झाले आणि, त्यांनी उत्सव साजरा करण्यास सुरवात केली. पण नंतर त्यांच्या असे लक्षात आले की हा दिवस वर्षात कधीच येत नाही. राजा-राणीने आपल्याला मूर्ख बनवले. ३१ मार्चनंतर १ एप्रिल हा फूल दिन म्हणून साजरा करण्यास त्यांनी सुरवात केली

 

जगभरात ‘एप्रिल फूल’ची परंपरा

एप्रिल फूल दिन वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. उदाहरणार्थ, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटनमध्ये एप्रिल फूल दिन फक्त दुपारपर्यंत साजरा केला जातो. काही देशांमध्ये – जपान, रशिया, आयर्लंड, इटली आणि ब्राझील येथे, फूल डे संपूर्ण दिवस साजरा केला जातो.

अर्थात राजकारण्यांपासूनच मूर्खपणाच्या दिवसाची सुरुवात झाली असली तरी सध्या तसे करणे त्या राजाराणीसारखे निरागस राहिलेले नाही आणि एका दिवसापुरते मर्यादितही नाही!


Tags: एप्रिल फूलराजकारण
Previous Post

बंगालात दुसऱ्या टप्प्याच्या मतदानात उत्साह, ममता बॅनर्जींचेही भविष्य आज ठरणार

Next Post

आजपासून हरिद्वारात कुंभमेळा…निगेटिव्ह रिपोर्ट असेल तरच प्रवेश!

Next Post
kumbhmela

आजपासून हरिद्वारात कुंभमेळा...निगेटिव्ह रिपोर्ट असेल तरच प्रवेश!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!