मुक्तपीठ टीम
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणतात तसा रुपया घसरत नसून डॉलर मजबूत होत असेलही, पण सामान्यांसाठी मात्र जे होते आहे, त्याचे परिणाम काय ते जाणून घेणं महत्वाचं आहे. कारण अनेकदा असं वाटतं की रुपया घसरला, डॉलर चढला तर आपल्याला काय त्याचं, पण तसं नसतं. रुपयाच्या चढ-उताराचा परिणाम तुमच्या आमच्या जीवनावरही होतोच होतो. कसं ते समजून घेवूया…
डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण थांबताना दिसत नाही. बुधवारी रुपयाची पुन्हा एकदा ऐतिहासिक घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रूपयाचा विनियम दर बुधवारी ८३ रूपयाच्याही पुढे गेला. रुपया ८३ च्या पुढे गेल्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी मंगळवारीही रुपयामध्ये घसरण दिसून आली. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत रुपयात आणखी घसरण होऊ शकते. रुपयाच्या घसरणीचे सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार हे जाणून घेऊया.
परदेशातून होणारी आयात महागणार, ग्राहकोपयोगी वस्तू भडकणार!
- परदेशातून आयातीसाठी आपण डॉलर्समध्ये व्यवहार करतो.
- डॉलर महागला की पूर्वीपेक्षा जास्त रुपये मोजावे लागतात.
- त्यामुळे देशात आयात होणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तूंसाठीही जास्त रुपये मोजावे लागतात.
- त्याचा थेट परिणाम सामान्य ग्राहकांवरही होतोच होतो.
- त्यावस्तू केवळ इलेक्ट्रॉनिक्स, मोबाइल, वाहनं अशा नसतात तर औषधं, पुस्तकं, संगणक अशाही असू शकतात.
कच्च्या मालासाठी डॉलरपेक्षा जास्त रुपये मोजावे लागणार !!
- रुपयाच्या घसरणीमुळे भारतीय उत्पादन महाग होण्याची शक्यता आहे.
- परदेशातून येणाऱ्या कच्च्या मालासाठी डॉलरपेक्षा जास्त रुपये मोजावे लागणार आहेत.
- त्याचबरोबर परदेशात मागणी मंदावल्याने विक्री करणेही कठीण होणार आहे.
- अशा स्थितीत निर्यातीवर अवलंबून असलेल्या व्यापाऱ्यांसाठी येणारा महिना अडचणींचा जाऊ शकतो.
- एवढेच नाही तर परदेशातून येणारा सर्व माल देशांतर्गत बाजारपेठेत महाग होईल, त्यांच्या उत्पादनासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल मोठ्या प्रमाणावर परदेशातून येतो.
तेल महागणार, खाद्यपदार्थ भडकणार!
- भारत सुमारे५० टक्के खाद्यतेल आयात करतो ज्याचे मूल्य डॉलरमध्ये चुकवले जाते.
- रुपयाच्या घसरणीमुळे खाद्यतेल महाग झाले आहे.
इंधनाच्या किंमती वाढल्याने महागाई भडकणार!
- आपल्या देशात एलपीजी आणि पीएनजी गॅस बहुतांश आयात केला जातो.
- रुपयाच्या घसरणीमुळे एलपीजी आणि पीएनजीही महाग होतील.
- याशिवाय वाढत्या कच्च्या तेलांच्या किमतीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतील, त्यामुळे उत्पादनांचा वाहतूक खर्च वाढेल.
- वाहतूक खर्च वाढेल
- त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढणार आहे.
- याशिवाय उत्पादनांच्या वाहतुकीच्या खर्चामुळे बहुतांश उत्पादनांना जास्त किंमत मोजावी लागणार आहे.
उत्पादक कंपन्यांचा खर्च वाढणार, नफा घटणार!
- कमजोर रुपयामुळे कंपन्यांसाठी आयात कच्च्या मालाची किंमत वाढेल.
- याशिवाय परदेशातून कर्ज उभारणे त्यांना महागात पडणार आहे.
- याची भरपाई करण्यासाठी कंपन्या उत्पादनांच्या किमती वाढवू शकतात, ज्याचा अंतिम भार ग्राहकांवर पडेल.
- अर्थात त्याचा अर्थ कंपन्यांचा नफा वाढेलच असं नाही.
गुंतवणूकही परिणाम!
- रुपयाच्या घसरणीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढतात.
- यामुळे दुहेरी नुकसान होते.
- स्वयंपाक, शिक्षण, वाहतूक खर्च वाढल्याने नेहमीच्या बजेटवर परिणाम होतो.
- खर्च वाढल्याने कमाईतून बचत कमी होते.