Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डॉ. झाकीर नाईकला आश्रय देणार्‍या कतारला भारताने प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे! – अॅड. सतीश देशपांडे

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Satish_Deshpande

मुक्तपीठ टीम

‘फिफा फुटबॉल विश्वचषका’चे आयोजन करणार्‍या कट्टर इस्लामी देश कतारमध्ये सर्व इस्लामी परंपरा पाळले जातात. कतारने यंदाच्या विश्वचषकाला धार्मिक रंग दिला आहे. विश्वचषक सुरु होण्यापूर्वी कतारमध्ये ५०० हून अधिक नागरिकांचे इस्लाममध्ये धर्मांतर केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. भारताने आतंकवादी म्हणून घोषित केलेला डॉ. झाकीर नाईक याला सध्या कोणताही देश आश्रय देत नसतांना कतारने आश्रय दिला आहे. याच कतारने हिंदु देवदेवतांची विडंबना करणारा वादग्रस्त चित्रकार मकबूल फिदा हुसेन यालाही आश्रय दिला होता. तसेच कतारने नुपूर शर्मा प्रकरणात भारताला खडसावले होते. भारताने उपस्थित केलेल्या प्रश्नावर ‘डॉ. झाकीर नाईकला आम्ही बोलावले नाही’, असे ‘राजकीय उत्तर’ कतारने दिले आहे. डॉ. झाकीर नाईकला आश्रय देणार्‍या कतारचा भारतविरोधी इतिहास पाहता कतारला कसे प्रत्युत्तर द्यावे, हे भारताने ठरवण्याची वेळ आता आली आहे, असे स्पष्ट प्रतिपादन इतिहास व संस्कृती अभ्यासक आणि लेखक अधिवक्ता सतीश देशपांडे यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘फिफा फुटबॉल विश्वचषकामध्ये जिहादी डॉ. झाकीर नाईक का आमंत्रित?’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होेते.

सुदर्शन न्यूजचे ‘चॅनेल हेड’ मुकेश कुमार म्हणाले की, डॉ. झाकीर नाईकला कट्टर इस्लामी देश कतारने फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या आयोजन कार्यक्रमात बोलावले. ‘फुटबॉल हा खेळ इस्लामनुसार ‘हराम’ आहे !’ हे ४ वर्षांपूर्वी डॉ. झाकीर नाईक याने म्हटले होते; तसेच त्याने त्या वेळी फुटबॉल खेळणे, पाहणे यालाही मनाई केली होती. झाकीर नाईकने त्या वेळी मलेशियात आसरा घेतला असल्याने २०१७ पासून भारत सरकार त्याला आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. झाकीर नाईक विरोधात २०१९ ला चार्टशीट दाखल झाली असून त्याच्या विरोधात ‘रेड कॉर्नर नोटिस’ दाखल व्हावी, यासाठी भारत प्रयत्न करत आहे. आता झाकीर नाईकने मलेशियातून कतार येथे स्थानांतर केल्यावर कतारने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, तरी तो फार काळ वाचवू शकणार नाही.

हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते सतीश कोचरेकर म्हणाले की, झाकीर नाईकने अत्यंत हीन स्तरावर हिंदु देवदेवतांवर टीका करत अपमान केला आहे. हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदु संघटनांच्या विरोधामुळे झाकीर नाईकला भारताबाहेर पलायन करावे लागले. ‘इसिस’सारख्या आतंकवादी संघटनांतील अनेक अतिरेक्यांनी झाकीरच्या भाषणांमुळे प्रेरणा मिळाली, हे उघडपणे कबूल केले आहे. या आंतरराष्ट्रीय आतंकवाद्याला फिफा फुटबॉल विश्वचषकात बोलावणार्‍या कतारचा आम्ही भारतीय नागरिकांच्या वतीने धिक्कार करतो.


Tags: Adv Satish PandeyDr Zakir naikHindu Janjagruti SamitiIndiaQatarअॅड. सतीश देशपांडेकतारडॉ. झाकीर नाईकभारत
Previous Post

आज का लागत नव्हते ‘जियो’चे कॉल?

Next Post

पुण्यात शिक्षकदिनी ‘जगदीशब्द’चा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

Next Post
Jagsabdhi

पुण्यात शिक्षकदिनी 'जगदीशब्द'चा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!