मुक्तपीठ टीम
भारतीय चलनी नोटांवर राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्यासारखाच लक्ष्मी आणि गणपती यांच्याही प्रतिमा असाव्यात, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. मोदी सरकार केजरीवाल यांच्या मागणीचा किती विचार करतील हा नंतरचा प्रश्न आहे. आजवर स्वतंत्र भारतात नोटांवर कोणत्याही देवीदेवतांच्या प्रतिमा नाहीत. पण, रिझर्व्ह बँकेनेही याआधीच ५ आणि दहा रुपयांच्या नाण्यांवर वैष्णो देवीची प्रतिमा उमटवली आहे.भारतीय चलनावर हिंदू देवता अवतरली ते काँग्रेसच्या कार्यकाळात, हे विशेष
माता वैष्णो देवीची प्रतिमा असलेली ५ आणि १० रुपयाची नाणी!
- स्वतंत्र भारताच्या इतिहासात नोटांवर कोणत्याही देवी-देवतेच्या प्रतिमा छापलेल्या नाहीत.
- हा पण नाण्यांवर नक्कीच त्यांच्या प्रतिमा उमटवण्यात आलेल्या आहेत.
- दोन नाणी आहेत ज्यावर माता वैष्णोदेवीची प्रतिमा आहे, ती व्यवहारात वापरण्यासाठीही जारी करण्यात आली.
- ही ५ आणि १० रुपयांची नाणी असून त्याच्या एका बाजूला माता वैष्णोदेवीची प्रतिमा आहे.
- या नाण्यावर देवनागरीमध्ये ‘श्री माता वैष्णो देवी श्राइन बोर्ड’ आणि इंग्रजीमध्ये ‘SHRI MATA VAISHNO DEVI SHRINE BOARD’ अशी अक्षरे आहेत.
- मातेच्या प्रतिमेखाली २०१२ कोरले आहे आणि त्याखाली SILVER JUBILEE असे लिहिले आहे.
- ही नाणी श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त जारी करण्यात आली.
- ही नाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) २०१३ मध्ये जारी केली होती.
काय म्हणाले होते अरविंद केजरीवाल?
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला सूचना करताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, भारतीय चलनावर एका बाजूला महात्मा गांधींचा फोटो ठेवा आणि दुसऱ्या बाजूला गणपती आणि माता लक्ष्मीचे फोटो छापा.
- गणेशजी सर्व प्रकारचे संकट दूर करतात आणि लक्ष्मी मातेला समृद्धीची देवी मानले जाते.
- नोटांवर त्यांचे फोटो छापून संपूर्ण देशाला त्यांचे आशीर्वाद मिळेल.
- यामुळे देशाची अर्थव्यवस्था निश्चितच सुधारेल.
- केजरीवालांच्या मागणीनंतर देशात राजकीय नेते, महापुरुष यांच्या प्रतिमांच्या नोटा जारी करण्याच्या मागणीची लाटच उसळली आहे.