मुक्तपीठ टीम
हिरो मोटोकॉर्पने भारतात एक्सप्लस २०० ४व्ही ची रॅली एडिशन लाँच केली आहे. कंपनीने या नवीन मॉडेलमध्ये एक रॅली किट देखील जोडली आहे.२२ जुलैपासून ही बाईक बुक करून खरेदी केली जाऊ शकते. बाईकचे ऑनलाइ बुकिंगही करता येईल.
हिरो एक्सप्लस, हिरो एक्सप्लस २०० ४व्ही इंजिन आणि फिचर्स…
- हिरोच्या या ऑफरमध्ये २००सीसी ४-व्हॉल्व्ह इंजिन वापरले आहे.
- या बाईकची किंमत कंपनीने १.५२ लाख रुपये एक्स-शोरूम दिल्लीत लाँच केली आहे.
- बाईकचे इंजिन १८.९बीएचपी पॉवर आणि १७.३५ एनएम पीक टॉर्क जनरेट करू शकते.
- या बाईकचे इंजिन ५-स्पीड गिअरबॉक्ससोबत जोडले आहे.
- ऑफरोडिंगची आवड असलेल्या लोकांसाठी ही बाईक पूर्णपणे तयार करण्यात आली आहे.
- या बाईकच्या पुढील भागात २१-इंच आणि मागील बाजूस १८-इंच व्हिल्स आहेत.
- या बाईकच्या पुढील आणि मागील बाजूस स्पोक व्हील्सचा वापर करण्यात आला आहे.
- या बाइकला अॅल्युमिनियम स्किड प्लेटचा आहे.
- बाईकला एलईडी हेडलाइट, एलईडी टेललाइट, डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर, ट्रिपर नेव्हिगेशन, कॉल असे अनेक फीचर्स आहेत.
- बाईकमध्ये कॉल अलर्ट आणि सिंगल चॅनल ए बी एस, अडजस्टेबल फ्रंट सस्पेंशन आणि अडजस्टेबल १० स्टेप रिअर सस्पेंशन सेटअप आहे.