मुक्तपीठ टीम
हार्ले डेव्हिडसन म्हटलं की बाइक प्रेमींच्या मनात वेगळ्याच लहरी उमटतात. ह्रदयाची धडधड वाटते. हिरो मोटोकॉर्पने हार्ले डेव्हिडसन पॅन अमेरिका १२५० अॅडव्हेंचर टूरर बाईक्सच्या पुढील बॅचचे बुकिंग सुरू केले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आणखी १३ हार्ले मॉडेल्स आणि आगामी स्पोर्टस्टर एससाठी देखील बुकिंग सुरू करण्यात आले आहे. हार्ले-डेव्हिडसनने या वर्षी एप्रिलमध्ये २०२१ पॅन अमेरिका १२५० एडीव्ही ला १६ लाख ९० हजार रुपयांना लाँच केले होते.
हार्ले डेव्हिडसन पॅन अमेरिका १२५० ही बाईक स्टँडर्ड आणि स्पेशल अशा दोन प्रकारांमध्ये प्रकारांमध्ये उपलब्ध असणार आहे.
- ही बाईक स्टँडर्ड आणि स्पेशल अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असणार आहे.
- दोन्ही प्रकारांच्या बाईक्समध्ये उपलब्ध असलेल्या काही प्रमुख फीचर्समध्ये फुल-एलईडी लाइटिंग, ब्लूटूथ-इनेबल्ड ६.८ इंच रंग टीएफटी टचस्क्रीन डिस्प्ले आणि यूएसबी सी-टाइप आउटलेटचा समावेश आहे.
- दोन्ही बाईक्स १२५२सीसी, रिव्हॉल्यूशन मॅक्स १२५० इंजिनसह येतात.
- हे इंजीनमध्ये जास्तीत जास्त १५० बीएचपी आणि १२७ एनएम टॉर्क निर्माण करण्याची क्षमता आहे.
- बाईकवरील ट्रान्समिशन पर्यायांमध्ये ६-स्पीड युनिटचा समावेश आहे.
लाँच झाल्यापासून, पॅन अमेरिका १२५० एडीव्ही ने उत्साही ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हिरोच्या प्रीमियम सेगमेंट बिझनेसचे प्रमुख रवी अवलूर म्हणाले, “पॅन अमेरिका १२५० ही २०२१ च्या सर्वाधिक प्रतीक्षित मोटरसायकलींपैकी एक आहे. हार्ले-डेव्हिडसनची साहसी-टूरिंग सेगमेंटमधील पहिली चढाई मानून, मोटारसायकलने अगोदरच मोठी कमाई केली आहे. ग्राहकांमध्ये यासाठी उत्साह निर्माण झाला आहे.” असे ते म्हणाले.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारतीय बाजारपेठेसाठी हार्ले-डेव्हिडसनसोबत भागीदारीची घोषणा केल्यानंतर, हिरो मोटोकॉर्प हार्ले मोटार सायकलींसाठी ग्राहक टच-पॉइंट आणि सेवा केंद्राचा विस्तार करत आहे. हिरो मोटोकॉर्पकडे आता संपूर्ण देशात १४ डीलरशिप आणि सात अधिकृत सेवा केंद्रे आहेत जे हार्ले-डेविडसन ग्राहकांसाठी आहेत.