Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना बळींच्या वारसांना फक्त ५० हजार! केंद्र सरकारचे संतापजनक प्रतिज्ञापत्र

September 6, 2026
in व्हा अभिव्यक्त!
0
corona

हेरंब कुलकर्णी / व्हा अभिव्यक्त!

कोरोनात ज्या कुटुंबात मृत्यू झाले. त्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये देण्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेले प्रमाणपत्र हे निराशजनक व संतापजनक आहे. याचिकाकर्त्यांनी प्रत्येक कुटुंबाला किमान ४ लाख रुपये देण्याची विनंती केली होती. त्याला हा प्रतिसाद हा विधवा महिलांच्या दुःखावर दुःखावर मीठ चोळणारा आहे.

 

केरळ सरकारने कोरोनातील विधवा महिलांना एक लाख, राजस्थान सरकारने दीड लाख, व आसाम सरकारने दोन लाख रुपयांची रोख एकरकमी मदत केली आहे. असे असताना सर्वोच्च असलेल्या केंद्र सरकारला चार लाख रुपयांची मदत करायला काय हरकत होती?

 

पूर वादळ व भूकंप या नैसर्गिक आपत्तीत शासन ज्या प्रमाणे मदत करते तशीच मदत या आपत्तीत सरकारने करायला हवी कारण मृत्यू पावलेल्या लोकांचा त्यात काहीच गुन्हा नव्हता… तेव्हा आपत्तीच्या नियमानुसार ही मदत सरकारने द्यायला हवी. गेली दोन महिने कोरोना एकल पुनर्वसन समितीचे कार्यकर्ते गावागावात जाऊन या महिलांच्या भेटी घेत आहेत तेव्हा एक तर यात मृत्यू पावलेले अनेक जण असंघटित क्षेत्रातील आहेत. यांना घरात बसणे शक्य नव्हते ते भाजीवाले फळविक्रेते ड्रायव्हर पेट्रोल पंपावरील कर्मचारी अशी संख्या मोठी आहे व त्यांना कोणताच आधार नाही आणि इतर विधवा व कोरोना विधवा यांच्यात फरक हा की अनेकांचे मृत्यू होताना हॉस्पिटलचे प्रचंड बिल झाले आहे. २ लाखांपासून १५ लाखापर्यंत बिले भरली आहेत. त्यातून ही सारी कुटुंबे आज कर्जबाजारी झाली आहेत. खाजगी सावकारांकडून अनेकांनी कर्ज काढले असून ती रक्कम फेडायची कशी हा प्रश्‍न आहे.. या महिलांना आज मुलांचे शिक्षण, घराची जबाबदारी आणि कर्ज फेडणे हे करण्यासाठी कोणताही व्यवसाय नाही अशा वेळी केंद्र सरकारची एकरकमी मदत नक्कीच उपयुक्त ठरली असती. केंद्र सरकारने किमान चार लाख रुपये या कुटुंबियांना दिलीच पाहिजे अशी कोरोना पुनर्वसन समितीची मागणी आहे..

 

या संदर्भात माननीय पंतप्रधान व महिला व बालकल्याण मंत्री यांना आमच्या समितीच्यावतीने हजार मेल आम्ही यापूर्वीच केले आहेत….

 

Heramb kulkarni

(ज्येष्ठ लेखक, सामाजिक अभ्यासक हेरंबकुलकर्णी हे कोरोना एकल पुनर्वसन समितीचे निमंत्रक आहेत. सरकारी यंत्रणेपर्यंत पीडितांच्या व्यथा वेदना समस्या पोहचवून न्याय मिळवून देण्याचं त्यांचं नेहमीचं कार्य कोरोना संकटातही सुरु आहे.)

 

 

“कोरोना मृत्यूंसाठी मागणी ४ लाखांची, तयारी ५० हजारांची! महागाईच्या काळात ही रक्कम पुरेशी ‘सन्मानजनक’ आहे?”


Tags: coronaHeramb Kulkarniकेंद्र सरकारकोरोनासर्वोच्च न्यायालयहेरंब कुलकर्णी
Previous Post

अखेर आता प्रवीण दरेकरांची चौकशी! मुंबई बँकेप्रकरणी अडचणीत आणणारे हेच ते १० मुद्दे

Next Post

“कोरोना मृत्यूंसाठी मागणी ४ लाखांची, तयारी ५० हजारांची! महागाईच्या काळात ही रक्कम पुरेशी ‘सन्मानजनक’ आहे?”

Next Post
corona

"कोरोना मृत्यूंसाठी मागणी ४ लाखांची, तयारी ५० हजारांची! महागाईच्या काळात ही रक्कम पुरेशी ‘सन्मानजनक’ आहे?"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!