Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देवेंद्रजी, अनाथ बालकांना आज बालदिनी बालसंगोपनची रद्द केलेली रक्कम भेट द्या!

September 5, 2026
in व्हा अभिव्यक्त!
0
देवेंद्रजी, अनाथ बालकांना आज बालदिनी बालसंगोपनची रद्द केलेली रक्कम भेट द्या!

हेरंब कुलकर्णी

आज बालदिन आहे. अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रातील अनाथ बालकांसाठी बजेटमध्ये बालसंगोपन योजनेची रक्कम ११२५ वरून २५०० रु जाहीर केली. पण तुमचे सरकार येताच तुमच्या सरकारच्या तुम्ही मंत्री असलेल्या अर्थविभागाने ही रक्कम वाढवण्यास नकार दिला आहे. राज्यातील हजारो अनाथ व विधवा महिलांच्या मुलांना वयाच्या १८ वर्षांपर्यंत या रकमेचा दरमहा शिक्षणासाठी लाभ मिळतो. या रकमेतून कोरोनात विधवा झालेल्या महिला मुलांचे शिक्षण करतात. पण जाहीर केलेली मदत नाकारून मुलांप्रति खूप अन्याय केला आहे.

वास्तविक महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत अगोदरच खुप कमी रक्कम दिली जाते.

  • उत्तरप्रदेश (मुख्यमंत्री बालसेवा योजना) ४००० रु प्रतिमहिना
  • कर्नाटक (बालसेवा योजना) ३५०० प्रतिमहिना
  • उत्तराखंड (वात्सल्य योजना) ३५०० प्रतिमहिना
  • मध्यप्रदेश (बालकल्याण योजना)५०००प्रतिमहिना
  • दिल्ली २५०० रुपये प्रतिमहिना
  • हिमाचल प्रदेश २५०० रुपये प्रतिमहिना
  • तामिळनाडू ३००० प्रतिमहिना
  • राजस्थान (पालनहार योजना) २००० योजना

ही राज्ये महाराष्ट्रापेक्षा गरीब असूनही विधवा व एकल पालकांच्या मुलांसाठी इतकी भरीव रक्कम देत असताना पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राने ११२५ रुपये असलेली रक्कम बजेटमध्ये २५०० करण्याची केलेली घोषणा नाकारावी, हे अत्यंत दुर्दैवी आहे

आज बालदिनाला केवळ मुलांना कोरड्या शुभेच्छा न देता तुमच्या सरकारने बजेटमध्ये नाकारलेली रक्कम आज सरकार देत असल्याची घोषणा करावी. तोच या अनाथ लेकरांसाठी यथार्थ बालदिन ठरेल!

heramb kulkarni

(हेरंब कुलकर्णी हे कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती महाराष्ट्र राज्य निमंत्रक आहेत.)


Tags: childrens daydevendra fadanvisHerambh kulkarniदेवेंद्र फडणवीसबालदिनमहाराष्ट्रहेरंब कुलकर्णी
Previous Post

घरबसल्या मतदार ओळखपत्र ऑनलाइन अर्ज करा! जाणून घ्या प्रक्रिया…

Next Post

ऑडी Q5 भारतात लाँच! अवघ्या ६.३ सेकंदात १०० किमीचा वेग!

Next Post
Audi Q5

ऑडी Q5 भारतात लाँच! अवघ्या ६.३ सेकंदात १०० किमीचा वेग!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!