Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

झारखंडमध्ये आता ७७ टक्के आरक्षण! वाढवलेले सुरक्षित ठेवण्यासाठी नव्या अनुसुचित समावेशाची मागणी!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Hemant Soren (2)

मुक्तपीठ टीम

झारखंड सरकारच्या आरक्षण टक्केवारी वाढवण्याच्या नव्या निर्णयामुळे त्या राज्यातील आरक्षण ७७ टक्क्यांवर पोहचले आहे. सरकारने ओबीसी आरक्षण वाढवत २७ टक्के, अनुसुचित जमातींचे आरक्षण २८ टक्के तर अनुसुचित जातींचे आरक्षण १२ टक्के केले आहे. त्यामुळे १० टक्के सवर्ण आरक्षणासह एकूण आरक्षण इंद्रा साहनी प्रकरणातील ५० टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा २७ टक्के जास्त झाले आहे.

वाढवलेले सुरक्षित राहावं यासाठी राज्य सरकारने केंद्रातील सरकारकडे हे आरक्षण संविधानाच्या नवव्या अनुसूचीत समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. तसेच यापुढील काळात झारखंड राज्यात स्थानिक म्हणजे तेच ज्यांची नावे १९३२ च्या खतियानीमध्ये म्हणजे शेती नोंदणीत असतील, असाही निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर कॅबिनेट सचिव वंदना डडेल यांनी सांगितले की, १९३२च्या सर्व्हे खतियानमध्ये ज्या व्यक्तीचे किंवा पूर्वजांचे नाव नोंदवले आहे, त्यांना स्थानिक म्हटले जाईल.

  • झारखंड मंत्रिमंडळाने राज्याच्या इतर मागासवर्गीयांसाठी २७ टक्के आरक्षणाच्या तरतुदीसाठी दुरुस्ती विधेयकाच्या मसुद्यालाही मंजुरी दिली आहे.
  • श्रीमती डडेल यांनी माहिती दिली की, कार्मिक प्रशासकीय सुधारणा विधेयक-२०२२ ला झारखंड पोस्ट आणि सर्व्हिसेस अॅक्ट, २००१ (सुधारित केल्यानुसार) मध्ये रिक्त पदांच्या आरक्षणात सुधारणा करण्यासाठी मंजुरी दिली आहे.
  • याअंतर्गत राज्यातील राखीव प्रवर्गाची टक्केवारी ७७ टक्के करण्यात आली आहे.
  • त्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकार भारत सरकारला विनंती करेल.
  • या दुरुस्तीनुसार राज्यातील अनुसूचित जातींना १२ टक्के, अनुसूचित जमातींना २८ आणि इतर मागास प्रवर्ग-१ ला १५, इतर मागासवर्गीयांना १२ टक्के आरक्षण देण्यात येणार आहे.
  • आर्थिकदृष्ट्या कमजोर दुर्बल विभागाला १० टक्के आरक्षण देण्यात येणार आहे.
    याची अंमलबजावणी करण्यापूर्वी भारत सरकारलाही यासाठी विनंती करण्यात येणार आहे.

झारखंडमध्ये आरक्षण किती वाढलं?

वर्ग     प्रथम   आता

एससी    १०      १२

एसटी    २६     २८

ओबीसी  १४      २७

ईडब्लूएस १०     १०


Tags: Hemant SorenJharkhandOBC reservationओबीसी आरक्षणखतियानझारखंडहेमंत सोरेन सरकार
Previous Post

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी

Next Post

शाळेतील चार वर्षांच्या चिमुरडीवर डिजिटल बलात्कार! जाणून घ्या डिजिटल अत्याचार आणि व्हा सावध!

Next Post
Rape Case

शाळेतील चार वर्षांच्या चिमुरडीवर डिजिटल बलात्कार! जाणून घ्या डिजिटल अत्याचार आणि व्हा सावध!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!