Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रातच नाही गुजरातसह २० राज्यांमध्ये पावसाचा हाहा:कार! शंभरपेक्षा जास्त पाऊस बळी!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
rain

मुक्तपीठ टीम

देशातील बहुतांश भागांमध्ये मोसमी पाऊस पोहचला ही आनंद वार्ता असतानाच पावसाचा हाहा:कारही वाढत आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही तर शेजारच्या गुजरातसह २० राज्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत पावसाने १४० पेक्षा जास्त बळी गेले आहेत. गुजरातमध्ये पावसाचा जबरदस्त फटका बसला आहे. अहमदाबादसह अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

देशातील बहुतांश राज्यांमध्ये पावसाने हाहा:कार पसरवला आहे. भारतातील २०हून अधिक राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत ६३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी महाराष्ट्रात १ जूनपासून पाऊस आणि पुरामुळे ७६ जणांना जीव गमवावा लागला आहे. गेल्या २४ तासांत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, मध्य प्रदेशात वीज पडून सात जणांचा मृत्यू झाला आहे.
मध्य प्रदेशातील ३३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

हवामान खात्यानुसार मध्य प्रदेशातील भोपाळ, इंदूर आणि जबलपूरसह ३३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. केरळ, कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. तेलंगणात गोदावरी नदीने धोक्याची दुसरी पातळी ओलांडली आहे. दिल्ली-एनसीआर आणि मध्य प्रदेशात पाऊस पडला, तर राजस्थानमध्ये पुढील दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गुजरातमधील ९ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे

  • गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे १७४ गावांचा वीजपुरवठा ठप्प झाला आहे.
  • नवसारी आणि वलसाड जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे.
  • एडीआरएफचे पथक पूरग्रस्त भागात पोहोचून मदत आणि बचाव कार्य करत आहेत.
  • आतापर्यंत ९ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. येथे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
  • गुजरातमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
  • सध्या एनडीआरएफच्या १३ आणि एसडीआरएफच्या १६ सैन्य-दल तैनात करण्यात आले आहेत.
  • वडोदराहून एनडीआरएफचं एक पथक छोटा उदयपूरला मदतीसाठी पाठवण्यात आले आहे. राज्यात मुसळधार पावसामुळे ३८८ रस्ते बंद आहेत.

गुजरातमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत!

  • गुजरातमध्ये संततधार पावसामुळे ६ जिल्ह्यांमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी फोनवरून चर्चा करून परिस्थिती जाणून घेतली.
  • केंद्राला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ४. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, आसाम, मेघालय या ईशान्येकडील राज्यांनंतर आता भारतीय हवामान खात्याने मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

देशातील बहुतांश राज्यांमध्ये पावसाने हाहा:कार पसरवला आहे. भारतातील २०हून अधिक राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत ६३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी महाराष्ट्रात १ जूनपासून पाऊस आणि पुरामुळे ७६ जणांना जीव गमवावा लागला आहे. गेल्या २४ तासांत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, मध्य प्रदेशात वीज पडून सात जणांचा मृत्यू झाला आहे.

Tags: disrupted public lifeGujaratMaharashtramonsoon rainsmuktpeethPrerequisiterain victimsगुजरातघडलं-बिघडलंजनजीवन विस्कळीतपाऊस बळीपूरस्थितीमहाराष्ट्रमुक्तपीठमोसमी पाऊस
Previous Post

महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमध्ये ‘रेन’ अलर्ट! धोका लक्षात घ्या, समुद्र, नदी किनारे टाळा!

Next Post

खासदार द्रौपदी मुर्मूंना पाठिंब्याचा शिवसेनेचा निर्णय! माघार की राजकीय चतुराई?

Next Post
Uddhav Thackeray And draupadi Murmu

खासदार द्रौपदी मुर्मूंना पाठिंब्याचा शिवसेनेचा निर्णय! माघार की राजकीय चतुराई?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!