मुक्तपीठ टीम
देशातील बहुतांश भागांमध्ये मोसमी पाऊस पोहचला ही आनंद वार्ता असतानाच पावसाचा हाहा:कारही वाढत आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही तर शेजारच्या गुजरातसह २० राज्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत पावसाने १४० पेक्षा जास्त बळी गेले आहेत. गुजरातमध्ये पावसाचा जबरदस्त फटका बसला आहे. अहमदाबादसह अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
देशातील बहुतांश राज्यांमध्ये पावसाने हाहा:कार पसरवला आहे. भारतातील २०हून अधिक राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत ६३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी महाराष्ट्रात १ जूनपासून पाऊस आणि पुरामुळे ७६ जणांना जीव गमवावा लागला आहे. गेल्या २४ तासांत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, मध्य प्रदेशात वीज पडून सात जणांचा मृत्यू झाला आहे.
मध्य प्रदेशातील ३३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
हवामान खात्यानुसार मध्य प्रदेशातील भोपाळ, इंदूर आणि जबलपूरसह ३३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. केरळ, कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. तेलंगणात गोदावरी नदीने धोक्याची दुसरी पातळी ओलांडली आहे. दिल्ली-एनसीआर आणि मध्य प्रदेशात पाऊस पडला, तर राजस्थानमध्ये पुढील दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
गुजरातमधील ९ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे
- गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे १७४ गावांचा वीजपुरवठा ठप्प झाला आहे.
- नवसारी आणि वलसाड जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे.
- एडीआरएफचे पथक पूरग्रस्त भागात पोहोचून मदत आणि बचाव कार्य करत आहेत.
- आतापर्यंत ९ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. येथे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
- गुजरातमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
- सध्या एनडीआरएफच्या १३ आणि एसडीआरएफच्या १६ सैन्य-दल तैनात करण्यात आले आहेत.
- वडोदराहून एनडीआरएफचं एक पथक छोटा उदयपूरला मदतीसाठी पाठवण्यात आले आहे. राज्यात मुसळधार पावसामुळे ३८८ रस्ते बंद आहेत.
गुजरातमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत!
- गुजरातमध्ये संततधार पावसामुळे ६ जिल्ह्यांमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी फोनवरून चर्चा करून परिस्थिती जाणून घेतली.
- केंद्राला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ४. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, आसाम, मेघालय या ईशान्येकडील राज्यांनंतर आता भारतीय हवामान खात्याने मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
देशातील बहुतांश राज्यांमध्ये पावसाने हाहा:कार पसरवला आहे. भारतातील २०हून अधिक राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत ६३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी महाराष्ट्रात १ जूनपासून पाऊस आणि पुरामुळे ७६ जणांना जीव गमवावा लागला आहे. गेल्या २४ तासांत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, मध्य प्रदेशात वीज पडून सात जणांचा मृत्यू झाला आहे.