Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“चांगला स्पर्श की वाईट स्पर्श, महिलांना कळतं!” बसमध्ये विकृत चाळे करणाऱ्याला सश्रम कारावास!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
mumbai high court

मुक्तपीठ टीम

विकृतांच्या चाळ्यांमुळे सार्वजनिक ठिकाणी महिलांना अनेकदा त्रास होत असतो. अनेकदा तसे चाळे करणारे बहाणे देत महिलांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न करतात. असंच एक प्रकरण मुंबईच्या बेस्ट बसमध्ये घडलं होतं. एका विकृतानं सीटवर बसलेल्या महिलेशी लगट करत आपल्या गुप्तांगाच्या भागाचा तिच्या खांद्याला स्पर्श करत होता. तिने विरोध करताच तो पट्ट्याचा स्पर्श असल्याचं तो म्हणाला. अखेर त्याला चोप देत महिलेने पोलीस तक्रार केली. या प्रकरणी न्यायालयाने आरोपी विनायकला सहा महिने सक्तमजुरीसह दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

 

ही घटना २०१५ मधली आहे. महिला आपल्या वडिलांसोबत घरी जाण्यासाठी बेस्ट बसमधून प्रवास करत होती. पीडित महिलेने मध्य मुंबईच्या वरळी भागातून बस पकडली होती. बसमध्ये एका विकृतानं सीटवर बसलेल्या महिलेशी विकृत चाळे केले. पुरुषाच्या या वागण्याने व्यथित झालेल्या महिलेने वडिलांच्या मदतीने त्याला मारहाण करून बसमधून उतरवले आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले.

 

न्यायालयाने ठोठावली शिक्षा

  • न्यायालयाने ६ महिन्यांची शिक्षा सुनावली
  • या प्रकरणी न्यायालयाने आरोपी विनायकला सहा महिने सक्तमजुरीसह दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
  • त्यापैकी सात हजार रुपयांची नुकसान भरपाई पीडितेला देण्यात आली आहे.
  • न्यायालयाने आरोपीच्या वकिलालाही फटकारले आहे.
  • खरेतर, आरोपीच्या वकिलाने न्यायालयात उलट तपासणीदरम्यान सांगितले होते की, जर महिलेला आपला विनयभंग होत असल्याचे वाटत असेल तर तिने तिची जागा बदलायला हवी होती.
  • ही अत्यंत घाणेरडी सूचना असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
  • अखेर पीडितेने आपल्यावर होत असलेल्या अन्यायाकडे दुर्लक्ष का करावे?

 

नेमकं काय घडलं?

  • पीडितेनुसार, ५ नोव्हेंबर २०१५ रोजी दुपारी १.४० वाजता ती आणि तिचे वडील घरी जाण्यासाठी बसमध्ये चढले होते.
  • आरोपी महिलेच्या सीटजवळ उभा होता आणि त्याने आपल्या गुप्तांगाचा भाग महिलेच्या खांद्यावर घासला.
  • यावर महिलेने आक्षेप घेतल्यावर तिने हसून त्याने पट्टा घट्ट करत असल्याचे सांगितले.
  • यानंतर महिलेने तिच्या वडिलांकडे तक्रार केली तसेच ड्रायव्हर आणि कंडक्टरला बस थांबवून बस सोडण्यास सांगितले.
  • त्यानंतर पीडित महिला आणि तिचे वडील आरोपीला घेऊन दादर पोलिस ठाण्यात गेले.

 

स्वतंत्र साक्षीदार नसल्याचा युक्तिवाद फेटाळला!

  • न्यायालयात खटला सुरू असताना बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितले की, या प्रकरणात स्वतंत्र साक्षीदार नाही.
  • ज्यावर न्यायालयाने म्हटले की, या प्रकरणात महिलेशिवाय हे कृत्य कोणीही पाहिलेले नाही. मुंबईसारख्या शहरात अनेकदा प्रवाशांची घाई असते, असेही न्यायालयाने म्हटले आहे. अशा प्रकरणांमध्ये साक्ष देण्यास कोणीही सहजासहजी तयार होत नाही.

Previous Post

चिमुरडीवर मोबाइल चोरीचा खोटा आरोप! दीड लाख नुकसानभरपाई!

Next Post

अमेरिकेत कोरोनावरील गोळीला मान्यता, ओमायक्रॉनवरही प्रभावी!

Next Post
US FDA

अमेरिकेत कोरोनावरील गोळीला मान्यता, ओमायक्रॉनवरही प्रभावी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!