Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चिमुरडीवर मोबाइल चोरीचा खोटा आरोप! दीड लाख नुकसानभरपाई!

न्यायालयाने पोलीस अधिकाऱ्याला जनतेपासून दूर ठेवण्यास सरकारला बजावलं!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
kerala high court

मुक्तपीठ टीम

केरळ उच्च न्यायालयाने ८ वर्षीय मुलीची याचिकेवर सुनावणी केल्यानंतर राज्य सरकारला तिला दीड लाख रुपये भरपाईचा आदेश दिला आहे. केरळमधील एका महिला पोलीस अधिकाऱ्याने ही मुलगी आणि तिच्या वडिलांवर आपला मोबाईल चोरल्याचा खोटा आरोप केला, त्यांचा छळ केला, असा आरोप होता. त्याविरोधात त्या मुलीने वडिलांसह न्यायालयात धाव घेतली होती.

 

या महिला अधिकाऱ्याला सामान्य जनतेशी थेट संपर्क साधण्याच्या कामापासून दूर ठेवण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने पोलीस विभागाला दिले आहेत. त्याचबरोबर त्याच्यावर विभागीय चौकशी व कारवाईही करण्यात येणार आहे. यासोबतच खटल्याच्या खर्चासाठी २५ हजार देण्यासही सरकारला सांगण्यात आले आहे.

 

महिला पोलीस अधिकाऱ्याचा खोटा आरोप

  • जयचंद्रन आणि त्यांची मुलगी थुंबा येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये विमानाची मूव्हमेंट पाहण्यासाठी गेले होते.
  • येथे केरळच्या पिंक पोलिस अधिकारी रजिता वाहतूक नियंत्रित करत होत्या. त्यांचा फोन न सापडल्याने त्यांनी जयचंद्रन आणि तिच्या मुलीवर चोरीचा आरोप केला.
  • त्यांना जीपमध्ये सोबत बसवले.
  • त्यामुळे मुलगी रडू लागली. तिथं गर्दी जमली.
  • त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता मोबाइल फोन पोलिसांच्या जीपमध्येच सापडला.

 

मुलीला नुकसानभरपाई द्याच!

  • केरळ उच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलगी आणि तिच्या वडिलांना अपमानित केल्याप्रकरणी नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.
  • कारण महिला पोलीस अधिकाऱ्याने आपल्या जबाबात कबूल केले होते की, वडील आणि मुलीला फोन मिळेपर्यंत तिने थांबवले होते.
  • महिला अधिकाऱ्यानेही कबुल केले होते की, गर्दी जमण्यापूर्वीच मुलगी रडायला लागली होती.
    पण पोलिस महानिरीक्षक (आयजीपी) यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, तेथे उपस्थित असलेल्या
  • लोकांचा उपहास ऐकून मुलगी रडू लागली.
  • पोलिसांनी असे प्रतिज्ञापत्र करून महिला अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला होता.

 

न्यायालयाची कडक भूमिका

  • २७ ऑगस्ट रोजी झालेल्या अपमानास्पद घटनेसाठी याचिकाकर्त्याने सरकारकडे ५० लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली होती.
  • या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने या अधिकाऱ्याविरुद्ध योग्य ती शिस्तभंगाची चौकशी व्हायला हवी, असेही म्हटले होते.
  • महिला अधिकाऱ्याच्या वर्तणुकीला पोलिसांचे समर्थन करणे म्हणजे लोकांच्या नजरेत तिची परिस्थिती बिघडवण्यासारखे आहे.

Tags: jaychandrankerala high courtthumbaकेरळ उच्च न्यायालयजयचंद्रनथुंबा
Previous Post

कसं आहे मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेचं आरोग्य? वाचा ‘मुंबई फर्स्ट – प्रजा फाऊंडेशन’ यांनी केलेली पडताळणी काय सांगते…

Next Post

“चांगला स्पर्श की वाईट स्पर्श, महिलांना कळतं!” बसमध्ये विकृत चाळे करणाऱ्याला सश्रम कारावास!

Next Post
mumbai high court

"चांगला स्पर्श की वाईट स्पर्श, महिलांना कळतं!" बसमध्ये विकृत चाळे करणाऱ्याला सश्रम कारावास!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!