मुक्तपीठ टीम
केरळ उच्च न्यायालयाने ८ वर्षीय मुलीची याचिकेवर सुनावणी केल्यानंतर राज्य सरकारला तिला दीड लाख रुपये भरपाईचा आदेश दिला आहे. केरळमधील एका महिला पोलीस अधिकाऱ्याने ही मुलगी आणि तिच्या वडिलांवर आपला मोबाईल चोरल्याचा खोटा आरोप केला, त्यांचा छळ केला, असा आरोप होता. त्याविरोधात त्या मुलीने वडिलांसह न्यायालयात धाव घेतली होती.
या महिला अधिकाऱ्याला सामान्य जनतेशी थेट संपर्क साधण्याच्या कामापासून दूर ठेवण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने पोलीस विभागाला दिले आहेत. त्याचबरोबर त्याच्यावर विभागीय चौकशी व कारवाईही करण्यात येणार आहे. यासोबतच खटल्याच्या खर्चासाठी २५ हजार देण्यासही सरकारला सांगण्यात आले आहे.
महिला पोलीस अधिकाऱ्याचा खोटा आरोप
- जयचंद्रन आणि त्यांची मुलगी थुंबा येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये विमानाची मूव्हमेंट पाहण्यासाठी गेले होते.
- येथे केरळच्या पिंक पोलिस अधिकारी रजिता वाहतूक नियंत्रित करत होत्या. त्यांचा फोन न सापडल्याने त्यांनी जयचंद्रन आणि तिच्या मुलीवर चोरीचा आरोप केला.
- त्यांना जीपमध्ये सोबत बसवले.
- त्यामुळे मुलगी रडू लागली. तिथं गर्दी जमली.
- त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता मोबाइल फोन पोलिसांच्या जीपमध्येच सापडला.
मुलीला नुकसानभरपाई द्याच!
- केरळ उच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलगी आणि तिच्या वडिलांना अपमानित केल्याप्रकरणी नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.
- कारण महिला पोलीस अधिकाऱ्याने आपल्या जबाबात कबूल केले होते की, वडील आणि मुलीला फोन मिळेपर्यंत तिने थांबवले होते.
- महिला अधिकाऱ्यानेही कबुल केले होते की, गर्दी जमण्यापूर्वीच मुलगी रडायला लागली होती.
पण पोलिस महानिरीक्षक (आयजीपी) यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, तेथे उपस्थित असलेल्या - लोकांचा उपहास ऐकून मुलगी रडू लागली.
- पोलिसांनी असे प्रतिज्ञापत्र करून महिला अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला होता.
न्यायालयाची कडक भूमिका
- २७ ऑगस्ट रोजी झालेल्या अपमानास्पद घटनेसाठी याचिकाकर्त्याने सरकारकडे ५० लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली होती.
- या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने या अधिकाऱ्याविरुद्ध योग्य ती शिस्तभंगाची चौकशी व्हायला हवी, असेही म्हटले होते.
- महिला अधिकाऱ्याच्या वर्तणुकीला पोलिसांचे समर्थन करणे म्हणजे लोकांच्या नजरेत तिची परिस्थिती बिघडवण्यासारखे आहे.