मुक्तपीठ टीम
उत्तरप्रदेशात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांचा मुलगा आशिष मिश्राला चार शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याच्या आरोपाखाली अटक झाली आहे. ते प्रकरण तापलेलं असतानाच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांचे शेतकऱ्यांबाबतचे वादग्रस्त विधान गाजू लागले आहे. चंदीगडमध्ये शेतकऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आवाहन केली की, शेतकऱ्यांच्याविरोधात लाठी उचलणारे स्वयंसेवक उत्तर-पश्चिम हरियाणाच्या प्रत्येक जिल्ह्यात उभे केले पाहिजेत.
मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या वादग्रस्त चिथावणीखोर भाषणाचा एक व्हिडीओ वायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री सांगत आहेत, ‘काही नवीन शेतकरी संघटना उदयास येत आहेत. आता त्यांना प्रोत्साहन द्यावे लागेल. त्यांना पुढे आणावे लागेल. विशेषतः उत्तर आणि पश्चिम हरियाणामध्ये. दक्षिण हरियाणात ही समस्या फारशी नाही. पण उत्तर-पश्चिम हरियाणाच्या प्रत्येक जिल्ह्यात तुमचे ५००-७०० शेतकरी किंवा हजार लोक उभे करा. त्यांना स्वयंसेवक बनवा. आणि मग होऊ द्या ‘शथे शत्यम समचरेत’.
तुरुंगात कशाला? मी पाहून घेईन!
- मुख्यमंत्र्यांनी लोकांना त्यांच्या विधानाचा अर्थ विचारला.
- उपस्थित लोकांकडून उत्तर आले जशास तसे!
- मुख्यमंत्री खट्टर यांनी प्रोत्साहन दिले.
- काही लोकांनी टाळ्या वाजवल्या.
- काही म्हणालेत की, ते ठिक आहे, पण मी पाहिन.
- असे म्हणत मुख्यमंत्री हसायला लागतात.
- शेवटी मुख्यमंत्री म्हणाले, ‘नाही-नाही, २-४ महिन्यांत तुम्ही आपोआप मोठे नेते व्हाल. काळजी करू नका. इतिहासात नाव लिहिले जाईल.
हरियाणातच अतिरक्ति दंडाधिकाऱ्यांनी दिले होते डोके फोडण्याचे आदेश!
- हरियाणामधील भाजपा सरकारची भूमिका नेहमीच शेतकरी आंदोलन चिरडण्याची राहिली आहे.
- २८ ऑगस्ट २०२१ रोजी मुख्यमंत्री खट्टर कर्नालमध्ये भाजपाची बैठक घेत असताना सभास्थळापासून काही अंतरावरच कर्नालचे तत्कालीन एसडीएम आयुष सिन्हा यांनी पोलिसांना शेतकऱ्यांचे डोके फोडण्याचा वादग्रस्त आदेश दिला होता.
- ते पोलिसांना हिंसाचारासाठी चिथावत असल्याचा व्हिडीओ वायरल झाला होता.
- यावर बराच गदारोळ झाला आणि शेतकऱ्यांनी महापंचायत बोलवून मिनी सचिवालयाला घेराव घातला.
- त्यानंतर राज्य सरकारला माघार घेत न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश द्यावे लागले आणि आयुष सिन्हांना चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर पाठवावे लागले.