कोणत्या ठिकाणी कोणती वाहतूक पद्धत उपलब्ध आहे. गुगल मॅपमुळे नव्या ठिकाणी हरवण्याची भीती नाही. गुगल मॅप म्हटलं तर प्रवासात रस्ता शोधण्याची काळजी नसते. ही सेवा फक्त काही सेकंदात आपला डेस्टिनेशन शोधून देते. आतापर्यंत गुगल मॅपवर सॅटेलाइट फोटो असायचे, पण आता त्यात खरे फोटो असतील. गुगलने बुधवारी एका निवेदनात स्पष्ट केले की, जेनेसिस इंटरनॅशनल आणि टेक महिंद्रा यांच्या भागीदारीत, रस्त्यांचे खरे फोटो पाहण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. निवेदनानुसार, रस्त्याचे फोटो गुगल मॅपवर उपलब्ध होणार आहे.