मुक्तपीठ टीम
गुलशन कुमारांच्या हनुमान चालीसाचा हरिहरन यांच्या आवाजातील व्हिडीओ यूट्यूबवर प्रचंड लोकप्रिय आहे. महाबली हनुमानाचे भक्त तो पाहतातच पाहतात. टी-सीरिजच्या या व्हिडीओला यूट्यूबवर २ अब्जाहून अधिक म्हणजे २०० कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. भारतातील हा पहिला यूट्युब व्हिडीओ आहे ज्याने २०० कोटींचा टप्पा पार केला आहे.
यूट्युब कमाईचा मोठा मार्ग!
टी-सीरिजच्या कमाईचा मोठा स्त्रोत म्हणजे त्याचे यूट्युब व्हिडीओ. टी-सीरिजला मुख्य यूट्यूब चॅनेल आणि प्लॅटफॉर्मवरील उप-चॅनेलवर 100 करोड व्युज आहेत. यूट्युब इंडिया २०१९ व्ह्यूअरशिप रिपोर्टनुसार, टॉप १० गाण्यांपैकी ६ गाणी टी-सीरिजची आहेत आणि टॉप १०० गाण्यांपैकी ४९ गाणी टी-सीरिजची आहेत. २०० कोटी व्ह्यूज ओलांडलेल्या हनुमान चालीसाचा व्हिडीओ हरिहरन यांनी गायला आहे, पण गुलशन कुमार व्हिडीओमध्ये दिसत आहेत. टी-सीरिजचे विनोद भानुशाली यांनी या यशानंतर आनंद व्यक्त केला आणि गुलशनजींचे जगात आपले स्थान निर्माण करण्याचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे सांगितले.
टी-सीरीजचा विक्रम
- टी-सीरिजच्या हनुमान चालीसा या व्हिडीओने २८ मे २०२० रोजी १०० कोटी व्ह्यूजचा टप्पा गाठला.
- तेव्हा देखील तो सर्वात जास्त पाहिला जाणारा व्हिडीओ होता.
- म्हणजेच कोरोनाच्या काळात त्याचे व्ह्यूज झपाट्याने वाढले.
- हा व्हिडीओ २०११ मध्ये म्हणजेच ९ वर्षांपूर्वी युट्युब वर अपलोड करण्यात आला होता.
- १०० कोटी व्हूज मिळाल्यानंतर, गुलशन कुमार यांचा मुलगा भूषण कुमार म्हणाले होते, “पप्पा, तुमच्या प्रार्थना नेहमी आमच्यासोबत असू द्या आणि त्याच प्रकारे आम्हाला अधिक यशस्वी होण्यास मदत करा.”
- हनुमान चालीसा हा व्हिडीओ दररोज लाखो वेळा पाहिला जातो.
- हे गाणे हिंदू कुटुंबांमध्ये मोठ्या श्रद्धेने ऐकले जाते.
युट्युबवर सर्वाधिक पाहिली जाणारी भारतातील टॉप ५ गाणी
- गुलशन कुमार आणि टी-सीरिजचे हरिहरन यांची हनुमान चालीसा (भक्ती सागर): २ अब्ज+ व्ह्यूज
- मन्नत नूरी गाणे लाँग लाची: १.३४ अब्ज+ व्ह्यूज
- जॅस मनक लेहेंगा : १.३३ + व्ह्यूज
- ध्वनी भानुशालीचे वास्ते: १.२७ अब्ज+ व्ह्यूज
- मेरी २ मधील राऊडी बेबी: १.२५ अब्ज+ व्ह्यूज