Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“भूजल पातळीतील घसरण थांबवण्यासाठी बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतीला पाणीपुरवठा गरजेचा”

पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

January 13, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Gulabrao Patil Statement on Agriculture supply through closed pipelines

मुक्तपीठ टीम

भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे होणारी भूजल पातळीतील घसरण थांबवण्यासाठी बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतीला पाणीपुरवठा करणे गरजेचे असून, यासाठी पाणी पुरवठा आणि कृषी विभागामार्फत जनजागृती करणे आवश्यक असल्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

            

अटल भूजल योजनेची राज्यस्तरीय शिखर समितीची दुसरी बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे कृषी मंत्री दादाजी भुसे, पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांची उपस्थिती होती. बैठकीत आयुक्त सी.डी.जोशी, उपसचिव राजेंद्र गेनजे तसेच राज्यस्तरीय शिखर समितीचे सदस्य आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

            

पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, लाभार्थींनी ठिबक सिंचन योजनेचे काम सुरू करण्यापूर्वी लोकसहभागाबरोबर अनुदान निधी उपलब्ध करून दिला तर लाभार्थींची संख्या वाढेल. यामुळे पाणी उपसा कमी होण्यास मदत होणार आहे. पाण्याच्या शाश्वत उपलब्धतेसाठी आणि तूट भरून काढण्यासाठी राज्य शासनाच्या विविध योजनांचे अभिसरण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            

अटल भूजल योजना राबविण्याकरिता राज्यासाठी एकूण ९२५ कोटी रुपये एप्रिल २०२० ते मार्च  २०२५ या कालावधीसाठी उपलब्ध होणार आहेत. यामध्ये भूजलसंबंधित माहिती व अहवाल जनसामान्यांसाठी खुले करणे, लोकसहभागातून जलसुरक्षा आराखडे तयार करणे, अस्तित्वातील राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांचे अभिसरण साध्य करणे, कार्यक्षम पाणी वापर (सूक्ष्म सिंचन) पद्धतीचा अंगीकार करणे, भूजल पातळीमधील घसरण दरामध्ये सुधारणा करणे तसेच, संस्थात्मक बळकटीकरण व क्षमता बांधणी याकरिता हा निधी खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            

कृषी मंत्री दादाजी भुसे म्हणाले, अटल भूजल योजनेत राज्यातील एकूण एक हजार ४४३ गावे आहेत. राज्यातील आणखी गावे या योजनेस पात्र होतील याकरिता पुनर्सर्वेक्षण करणे गरजचे आहे. यामुळे शेतकऱ्यांना विविध योजनांचाही लाभ मिळू शकेल.

            

या योजनेच्या अमंलबजावणी करण्यासाठी पीक आणि पाणी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. सूक्ष्म सिंचन, मल्चिंग, मूरघास, फळबाग व इतर नाविन्यपूर्ण कामांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


Tags: Atal Ground Water SchemeDadaji BhuseGulabrao Raghunath Patilअटल भूजल योजनागुलाबराव पाटीलदादाजी भुसे
Previous Post

संसदेत वाढता संसर्ग, सातशेपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त! अधिवेशनाचं काय होणार?

Next Post

राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राचे यश, ८ ‘सुवर्ण’सह ३० पदकांची कमाई

Next Post
Maharashtra's success in the National Skills Competition

राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राचे यश, ८ ‘सुवर्ण’सह ३० पदकांची कमाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!