Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

संसदेत वाढता संसर्ग, सातशेपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त! अधिवेशनाचं काय होणार?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
parliment (2)

मुक्तपीठ टीम

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन काही दिवसातच सुरु होणार आहे. याच दरम्यान संसदेतल्या कर्मचाऱ्यांभोवती कोरोनाने विळखा घातला आहे. आतापर्यंत संसद भवनातील ७१८ हून अधिक अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन वेळेत पूर्ण करणे मोठे आव्हान ठरू शकते. यापैकी बहुतेक लक्षणे नसलेले आढळले आहेत. ३१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती अधिकारी व्यक्त करत आहेत.

राज्यसभेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “४ डिसेंबरपासून संसद भवनात तपासण्यात आलेल्या लोकांपैकी ७१८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. यामध्ये राज्यसभा सचिवालयातील २०४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. उर्वरित लोकसभा सचिवालय आणि संसदेशी संबंधित आहेत.

 

९ जानेवारीपर्यंत संसदेत सुमारे ४०० कोरोनाची प्रकरणे होती. नवीन आकडेवारीनुसार संसदेच्या अधिकार्‍यांमध्ये अवघ्या तीन दिवसांत ४३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

 

लोकसभा आणि राज्यसभेने त्यांच्या एक तृतीयांश कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. दोन्ही सभागृहांनी त्यांच्या अवर सचिव/कार्यकारी अधिकारी पदावरील ५०% अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जानेवारी अखेरपर्यंत घरून काम करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

राज्यसभेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे आयोजन कसे करावे यावर विचारमंथन सुरू आहे. राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत परिस्थितीचा आढावा घेतला आणि दोन्ही सभागृहांच्या सरचिटणीसांना पर्याय शोधण्यास सांगितले आहे.

 

ते म्हणाले, “आम्ही विविध पर्यायांचा विचार करत आहोत. परंतु या महिन्याच्या अखेरीस कोरोनाच्या स्थितीवर अंतिम पर्याय अवलंबून असेल. अधिवेशन कसे चालवायचे याचा निर्णय घेण्यासाठी २५ किंवा २६ जानेवारीच्या आसपास लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेचे अध्यक्ष यांची बैठक होणार आहे.


Tags: coronaparliamentअर्थसंकल्पीय अधिवेशनकोरोनासंसद भवन
Previous Post

मंत्रालयात आता हजेरीसाठी फेस रिकग्निशन यंत्रणेचा प्रायोगिक तत्त्वावर वापर होणार

Next Post

“भूजल पातळीतील घसरण थांबवण्यासाठी बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतीला पाणीपुरवठा गरजेचा”

Next Post
Gulabrao Patil Statement on Agriculture supply through closed pipelines

"भूजल पातळीतील घसरण थांबवण्यासाठी बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतीला पाणीपुरवठा गरजेचा"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!