Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“स्वच्छ भारत सर्वेक्षणात महाराष्ट्र अग्रेसर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे”: गुलाबराव पाटील

स्वच्छ भारत ग्रामीण सर्वेक्षण कार्यशाळेचे ऑनलाईन उद्घाटन

October 13, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
gulabrao patil

मुक्तपीठ टीम

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा -२ अंतर्गत सन २०२१ २२ या वर्षात केंद्र स्तरावरुन राज्यात ३४ जिल्ह्यातील ९१२ गावात स्वच्छ सर्वेक्षण, २०२१ केले जाणार आहे. यावर्षीही स्वच्छ भारत सर्वेक्षणात महाराष्ट्र अग्रेसर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

 

मंत्रालयात स्वच्छ भारत ग्रामीण सर्वेक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. यावेळी पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, पाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव संजय चहांदे, प्रकल्प संचालक रवींद्र शिंदे, जिल्हा स्तरावरून सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

पाणीपुरवठा मंत्री पाटील म्हणाले, स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१९ मध्ये राज्याला स्वच्छ राज्य म्हणून गौरविण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र आतापर्यंत पुढे आहे. महाराष्ट्र नेहमी पुढे राहून प्रथम क्रमांकावर असावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. २ ऑक्टोबर, २०२१ पर्यंत राज्यातील ७७५ गावे हागणदारीमुक्त अधिक शौचालययुक्त (ODF+) घोषित करण्यात आली आहेत. मार्च, २०२२ पर्यंत एकूण १९,६२४ गावे हागणदारीमुक्त अधिक (ODF+) घोषित करावयाची आहेत. त्यासाठी नियोजन करावे.

 

जून २०२० नंतर केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर जिल्हा स्तरावरुन एकूण ४३६८ सार्वजनिक/सामुदायिक शौचालयांकरिता नोंदणी करण्यात आलेली असून त्यापैकी २४८५ शौचालयांची बांधकामे पूर्ण झालेली आहेत. तर उर्वरीत कामे प्रगतीपथावर आहेत, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

 

राज्यस्तरावरुन १५ जून, २०२१ रोजी ग्रामीण भागात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी कृती आराखडे तयार करण्याकरिता ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात आले होते. त्यानंतर घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनांतर्गत राज्यातील एकूण ९९७१ गावांचे प्रारुप आराखडे तयार करण्यात आले आहेत. उर्वरीत आराखडे लवकर तयार करावेत, अशा सूचनाही पाटील यांनी यावेळी दिल्या.

 


Tags: Maharashtraगुलाबराव पाटीलमहाराष्ट्रस्वच्छ भारत सर्वेक्षण
Previous Post

देशात आणखी शंभर सैनिक शाळा!

Next Post

“आदिवासीबहुल भागाच्या जलद विकासासाठी वीज, जलसंधारणाची कामे त्वरीत पूर्ण करावी”

Next Post
dadaji bhuse

"आदिवासीबहुल भागाच्या जलद विकासासाठी वीज, जलसंधारणाची कामे त्वरीत पूर्ण करावी"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!