Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, संघटनेत काम करण्याची इच्छा! खरं कारण काय?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
vijay rupani

मुक्तपीठ टीम

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आज अचानक राजीनामा देऊन आश्चर्ययाचा धक्का दिला. ते राज्यपाल आचार्य देवव्रत यांना भेटायला गेले तेव्हाच राजीनाम्याची चर्चा सुरु झाली होती. परतल्यानंतर त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली. रुपाणी यांनी राजीनाम्याचं कारण संघटनात्मक कामाची इच्छा हे सांगितलं असलं तरी प्रत्यक्षात कारणं वेगळीच असल्याचे सांगितले जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेली ही घडामोड निवडणुकीसाठीच्या भाजपाच्या रणनीतीचा एक भाग असण्याची शक्यता मानली जाते.

 

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुरुवारी गुजरातमध्ये आले. त्यावेळी त्यांच्या भेटीचे कारण खासगी म्हणजे बहिणीला भेटायचे मानले गेले. आता मात्र त्यांच्या भेटीला गुजरात नेतृत्वबदलाशी जोडले जात आहे. त्यांनी नुकतीच एक बैठक घेतली होती, त्यातील चर्चेनंतर गुजरात नेतृत्वबदलाचा निर्णय नक्की करण्यात आला, असेही सांगितले जाते.

 

राजीनाम्यानंतर विजय रुपाणी काय बोलले?

  • पक्षात जबाबदाऱ्या बदलत राहणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.
  • मला पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली, ही मोठी गोष्ट आहे.
  • रुपाणी म्हणाले की जेपी नड्डा जी यांचे मार्गदर्शन माझ्यासाठी देखील अभूतपूर्व आहे.
  • आता मला जी काही जबाबदारी मिळेल ती मी पार पाडीन.
    आम्ही म्हणतो जबाबदारी, नाही पद नाही.
  • मला जी जबाबदारी देण्यात आली होती ती मी पार पाडली आहे.

पुढचा मुख्यमंत्री पाटीदार समाजातून?

  • गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका आहेत.
  • गुजरातमधील पटेल समाज भाजपावर नाराज असल्याचे मानले जाते.
  • त्यामुळे पाटीदार समाजाची नाराजी दूर करण्यासाठी भाजपाने रणनीतीचा एक भाग म्हणून नेतृत्व बदल केला असण्याची चर्चा आहे. नितीन पटेलसारख्या पाटीदार नेत्याला मुख्यमंत्री केले जाण्याची शक्यता आहे.
  • तसे नाही झाले तरी किमान तिसराच नेता निवडून भाजपाविरोधातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न असण्याची शक्यता आहे.

हार्दिक पटेलांची टीका, नाराजी टाळण्यासाठी दिशाभुलीचा प्रयत्न!

  • गुजरातेतील पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी भाजपाची ही चाल असल्याचे म्हटले आहे.
  • भाजप जनतेची दिशाभूल करत आहे.
  • कोरोनामधील अराजकता आणि अपयशामुळे लोकांमध्ये नाराजी होती. भाजप मुख्यमंत्री बदलून जनतेची दिशाभूल करत आहे.
  • भाजपाने उत्तराखंडमध्येही निवडणुकापूर्वी नेतृत्वबदल केला.

 

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा दुपारी राजीनामा…सकाळी पंतप्रधान मोदी काय बोलले?


Tags: Amit ShahBJPGujaratprime minister narendra modivijay rupaniविजय रुपाणी
Previous Post

“साकीनाका घटनेचं राजकारण म्हणजे मृताच्या टाळूवरचं लोणी खाणं”: संजय राऊत

Next Post

“अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे काटेकोरपणे करा”: विजय वडेट्टीवार

Next Post
vijay wadenttiwar

"अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे काटेकोरपणे करा": विजय वडेट्टीवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!