मुक्तपीठ टीम
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आज अचानक राजीनामा देऊन आश्चर्ययाचा धक्का दिला. ते राज्यपाल आचार्य देवव्रत यांना भेटायला गेले तेव्हाच राजीनाम्याची चर्चा सुरु झाली होती. परतल्यानंतर त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली. रुपाणी यांनी राजीनाम्याचं कारण संघटनात्मक कामाची इच्छा हे सांगितलं असलं तरी प्रत्यक्षात कारणं वेगळीच असल्याचे सांगितले जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेली ही घडामोड निवडणुकीसाठीच्या भाजपाच्या रणनीतीचा एक भाग असण्याची शक्यता मानली जाते.
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुरुवारी गुजरातमध्ये आले. त्यावेळी त्यांच्या भेटीचे कारण खासगी म्हणजे बहिणीला भेटायचे मानले गेले. आता मात्र त्यांच्या भेटीला गुजरात नेतृत्वबदलाशी जोडले जात आहे. त्यांनी नुकतीच एक बैठक घेतली होती, त्यातील चर्चेनंतर गुजरात नेतृत्वबदलाचा निर्णय नक्की करण्यात आला, असेही सांगितले जाते.
राजीनाम्यानंतर विजय रुपाणी काय बोलले?
- पक्षात जबाबदाऱ्या बदलत राहणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.
- मला पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली, ही मोठी गोष्ट आहे.
- रुपाणी म्हणाले की जेपी नड्डा जी यांचे मार्गदर्शन माझ्यासाठी देखील अभूतपूर्व आहे.
- आता मला जी काही जबाबदारी मिळेल ती मी पार पाडीन.
आम्ही म्हणतो जबाबदारी, नाही पद नाही. - मला जी जबाबदारी देण्यात आली होती ती मी पार पाडली आहे.
पुढचा मुख्यमंत्री पाटीदार समाजातून?
- गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका आहेत.
- गुजरातमधील पटेल समाज भाजपावर नाराज असल्याचे मानले जाते.
- त्यामुळे पाटीदार समाजाची नाराजी दूर करण्यासाठी भाजपाने रणनीतीचा एक भाग म्हणून नेतृत्व बदल केला असण्याची चर्चा आहे. नितीन पटेलसारख्या पाटीदार नेत्याला मुख्यमंत्री केले जाण्याची शक्यता आहे.
- तसे नाही झाले तरी किमान तिसराच नेता निवडून भाजपाविरोधातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न असण्याची शक्यता आहे.
हार्दिक पटेलांची टीका, नाराजी टाळण्यासाठी दिशाभुलीचा प्रयत्न!
- गुजरातेतील पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी भाजपाची ही चाल असल्याचे म्हटले आहे.
- भाजप जनतेची दिशाभूल करत आहे.
- कोरोनामधील अराजकता आणि अपयशामुळे लोकांमध्ये नाराजी होती. भाजप मुख्यमंत्री बदलून जनतेची दिशाभूल करत आहे.
- भाजपाने उत्तराखंडमध्येही निवडणुकापूर्वी नेतृत्वबदल केला.
गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा दुपारी राजीनामा…सकाळी पंतप्रधान मोदी काय बोलले?