मुक्तपीठ टीम
GST इंटेलिजन्सच्या टीमने कर बुडवल्याच्या आरोपाखाली कन्नौजमधील अत्तर व्यापारी पियुष जैन याला कानपूर येथून अटक केली आहे. त्यांच्या कन्नोज येथिल घरात अगदी चित्रपटात दाखवतात तसचं भिंतीत नोटा, फरशीत सोने सापडले आहेत. आत्तापर्यंतच्या छाप्यांमध्ये जैन यांचे निवासस्थान आणि इतर परिसरातून २५७ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. २३ डिसेंबरपासून सुरू झालेली आयकर विभागाची कारवाई सुरूच आहे, मिळालेल्या माहितीनुसार, पुढील कारवाईसाठी जैन यांना कानपूरहून अहमदाबादला नेले जाऊ शकते.
२५ किलो सोने आणि कोट्यवधी किमतीची मालमत्ता कागदपत्रे
- आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, पियूष जैन यांच्याकडून २५७ कोटींच्या रोख रकमेशिवाय १२५ किलो सोने आणि कोट्यवधींच्या मालमत्तेची कागदपत्रे सापडली आहेत.
- DGGI च्या छाप्यांमध्ये आतापर्यंत सुमारे १००० कोटी रुपयांच्या मालमत्तेचा खुलासा करण्यात आला आहे.
- सध्या ही टीम सतत जैन यांच्या कन्नौज येथील निवासस्थानांची पाहणी करत आहे.
- गेल्या २४ तासांपासून पियुष यांच्या सात घरांच्या भिंती, तळघर, कपाट आणि लॉकर्स फोडण्यात आले आहेत.
कर कसे बुडवायचे?
- विभागीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्तर व्यापारी पियुष अनेक वेळा कमी विक्री दाखवून कमी कर भरायचा.
- याशिवाय बनावट कंपन्यांची बिले कापून तो कर चुकवत असे.
- आतापर्यंत जैन यांच्या विविध ठिकाणांहून एकूण २५७ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.
प्रकरण कसे उघड झाले?
- वास्तविक, कोट्यवधींची ही कर बुडवल्याचे तेव्हा उघडकीस आली जेव्हा डीजीजीआय टीमने अहमदाबादमधून एक ट्रक पकडला.
- या ट्रकमध्ये जाणाऱ्या मालाचे बिल बनावट कंपन्यांच्या नावाने बनवण्यात आले होते.
- यानंतर डीजीजीआय टीमने शिखर मसाला उत्पादकाच्या ठिकाणी छापा टाकला.
- येथे डीजीजीआयला सुमारे २०० बनावट बिले मिळाली.
- येथूनच डीजीजीआयला पीयूष जैनच्या फसवणुकीची माहिती मिळाली आणि सध्या सुरू असलेल्या तपासात एकापाठोपाठ एक करोडोंच्या संपत्तीचा खुलासा होत आहे.