Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘सेलिब्रिटी’ नेते शशी थरुरांना काँग्रेसचा इशारा, “मर्यादेत राहा, नाहीतर हकालपट्टी!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
shashi tharoor

मुक्तपीठ टीम

काँग्रेसचे ‘सेलिब्रिटी’ बुद्धिमंत नेते म्हणून ओळखले जाणारे खासदार शशी थरूर यांना काँग्रेसने इशारा दिला आहे. त्यांच्या गृहराज्यातील एका प्रकल्पाबद्दलचा काँग्रेसचा निर्णय ते पाळत नसल्यामुळे प्रदेशाध्यक्षांनी त्यांना हकलापट्टीचा इशारा दिला आहे.

केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे (केपीसीसी) अध्यक्ष के सुधाकरन यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्यासह पक्षातील इतर कोणालाही त्यांचे निर्देश नाकारण्याचा अधिकार नाही. त्याच वेळी, सुधाकरन यांनी थरूर यांना इशारा दिला की त्यांना काँग्रेसने घेतलेल्या निर्णयांच्या मर्यादेत रहावे लागेल, नाहीतर त्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल.

शशी थरुरांची गाडी पक्षाच्या रुळावरून घसरतेय…

  • कन्नूरमध्ये माध्यमांशी बोलताना सुधाकरनांनी थरुरांना चांगलंच सुनावलं.
  • शशी थरूर पक्षातील फक्त एक व्यक्ती आहेत.
  • शशी थरूर म्हणजे काँग्रेस नाही.
  • पक्षाच्या निर्णयांच्या मर्यादेत राहिल्यास ते पक्षाचा भाग असतील.
  • नाहीतर त्यांची हकालपट्टी केली जाईल.
  • पक्षाच्या खासदारांनी केरळमधील ‘सेमी-हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर’ विरोधात केंद्राला दिलेल्या पत्रावर स्वाक्षरी करण्यास थरुर यांनी नकार दिला आहे.
  • त्यांनी अलीकडेच डाव्या आघाडीचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची उघडपणे प्रशंसा केली.
  • त्यामुळे राज्यातील नेते थरुरांवर चिडले आहेत.
  • आपल्या पक्षाच्या सहकाऱ्यांच्या टीकेला उत्तर देताना थरूर यांनी ट्विट केले होते की काही मुद्द्यांवर राजकीय मतभेद बाजूला ठेवणे आवश्यक आहे.

 

सिल्व्हर लाईन प्रकल्पाचा अभ्यास करून आपले मत मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सुधाकरन म्हणाले की प्रत्येकाला स्वतःचे मत बनवण्याचा अधिकार आहे, “पण ते शशी थरूर असोत किंवा के सुधाकरन, पक्षाचे निर्णय नाकारण्याचा अधिकार कोणालाही नाही.” पक्षातील कोणालाही असा अधिकार दिलेला नाही, खासदारालाही नाही, असेही ते म्हणाले. सुधाकरन म्हणाले की, थरूर यांच्याकडून लेखी स्पष्टीकरण मागवण्यात आले असून ते प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला


Previous Post

राणेंना अटकेची भीती वाटते त्या सिंधुदुर्गातील संतोष परब हल्ला प्रकरणाशी त्यांच्या संबंधाची चर्चा का?

Next Post

‘समाजवादी’ अत्तरवाल्याकडे २९१ कोटीची रोकड! हजार कोटीची मालमत्ता!

Next Post
piyush jain house money

'समाजवादी' अत्तरवाल्याकडे २९१ कोटीची रोकड! हजार कोटीची मालमत्ता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!