मुक्तपीठ टीम
खेलो इंडिया या योजनेला क्रीडामंत्री रिजीजू यांनी ४ वर्षांची मुदतवाढ देण्यात आल्याचे जाहीर केले आहे. यापूर्वी ही क्रीडा योजना २०२१-२२ या वर्षात संपणार होती, परंतु याची २०२५-२६ पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.
“क्रीडा मंत्रालयाने खेलो इंडिया योजना २०२१-२२ ते २०२५-२६ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या ४ वर्षातील खेळावरील एकूण खर्च ८,७५० कोटी इतका आहे. त्याचा एस्टीमेट वित्त मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. खेलो इंडिया योजनेंतर्गत २०२१-२२ वर्षासाठी ६५७.७१ कोटी मंजूर झाले आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणारा खेलो इंडिया युथ गेम्स २०२०मध्ये कोरोनामुळे रद्द करण्यात आला होता. २०२१ चे खेळ यावर्षी टोकियो ऑलिम्पिकनंतर होणार आहेत. त्यांचे आयोजन हरियाणाच्या पंचकुला यांनी केले आहे. तसेच, युथ गेम्सचे वेळापत्रक अजूनही जाहीर झालेले नाही. यावर्षी २३ जुलै ते ८ ऑगस्ट पर्यंत टोकियो ऑलम्पिक होणार आहेत.
खेलो इंडियाबद्दल सर्व काही…
- पहिला खेलो इंडिया स्कूल गेम्स ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत दिल्लीत झाला.
- यामध्ये १७ वर्षाखालील खेळाडूंनी भाग घेतला होता. दुसऱ्यांदा ९ ते २० जानेवारी २०१९ दरम्यान हे खेळ महाराष्ट्रातील पुणे येथे घेण्यात आले.
- यात शाळेसह अंडर -२१ खेळाडूंचा समावेश होता. तिसऱ्यांदा युनिव्हर्सिटी गेम्ससुद्धा सुरू झाले. जेणेकरून २५ वर्षांखालील खेळाडूंना देखील व्यासपीठ मिळू शकेल.
- यंदा तिसर्यांदा १० ते २२ फेब्रुवारी दरम्यान गुवाहाटी येथे पार पडले. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स ओडिसामध्ये पार पडले.
- खेलो इंडियामध्ये, शालेय राष्ट्रीय खेळाचे टॉप-८ खेळाडूंना व संघ आणि इतर क्रीडा संघटनांच्या अन्य स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळते.
- यापैकी अव्वल खेळाडूंची निवड करुन त्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.
- आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीसाठी सर्वोत्तम खेळाडूंना दरवर्षी ८ वर्षांसाठी ५ लाख रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
- त्यापैकी एक लाख २० हजार रुपये पॉकेट मनी म्हणून दिले जातात आणि उर्वरित रक्कम त्यांच्या राहण्या, खाणे, पिणे, प्रशिक्षण यासाठी खर्च केली जाते.
- खेलो इंडिया अंतर्गत निवडलेले अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकून टारगेट ऑलम्पिक पोडियम योजनेत सामील झाले आहेत.
स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (एसएआय) च्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वेटलिफ्टर जेरेमी लालरिननुंगा, नेमबाज सौरभ चौधरी, मनु भाकर, जलतरणपटू श्री हरी नटराज हे खेलो इंडियाचेच आहेत. मनु भाकर, सौरभ चौधरी यांनीही ऑलम्पिक कोटा जिंकला आहे.
पाहा व्हिडीओ: