Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रातील दुर्गम भागात आता ड्रोनने हवाई बीज पेरणी

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
dron

मुक्तपीठ टीम

पारंपरिक वृक्ष लागवडीबरोबरच दुर्गम भागात ड्रोनद्वारे हवाई बीज पेरणीने जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्यावर वन विभागाने भर द्यावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. यंदाच्या पावसाळी वृक्ष लागवड नियोजनाबाबत आढावा बैठकीत त्यांनी ही वेगळी कल्पना मांडली. यावर्षी वनविभागाकडून एकंदर ४ कोटी रोपे लावण्यात येणार आहेत.

 

सर्वसामान्य जनतेला आपली वाटावी अशी योजना व्हावी

वृक्ष लागवड करताना पर्यावरण प्रेमी, जंगल प्रेमी तसेच स्वयंसेवी संस्था, युवक यांचा सहभाग घ्यावा. यासाठी त्यांना आवाहन करण्यात यावे. वृक्ष लागवडीसाठी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करावे. जनतेला आपली वाटेल अशी ही वृक्षलागवड योजना झाली पाहिजे, अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

 

भौगोलिक प्रदेश व हवामानानुसार वृक्ष लागवड व्हावी

प्रत्येक भौगोलिक प्रदेशानुसार पावसाळी परिस्थिती व हवामानाची स्थिती,जमीन याचा अंदाज घेवून व जी झाडे उपयुक्त आहेत त्याप्रमाणे वृक्षारोपण करण्यात यावे. वृक्षारोपण करतांना खरे उद्दिष्ट ठरवून खरेखुरे उद्दिष्ट गाठावे. वृक्षलागवडीचा कालबद्ध कार्यक्रम आखावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

 

पर्यटकांना आकर्षित करणारी शोभिवंत झाडे लावावी

वृक्ष लागवड करताना पर्यटनाचाही विचार व्हावा. शहरी भागात रस्त्याच्या दुतर्फा पर्यटकांना आकर्षित करणारी शोभिवंत झाडे लावावी. तसेच जपानमध्ये ज्याप्रमाणे माऊंट येशीनो येथे नैसर्गिकरित्या दरी फुलून जाते. त्याप्रमाणे राज्यात डोंगर उतारावर काय करता येईल याचाही विचार वनविभागाने करावा. झाडांच्या देशी प्रजाती लावण्यावर भर देण्यात यावा जेणे करून पक्ष्यांना देखील खाद्य व आश्रय मिळेल.

जव्हार, कोल्हापूर, सावंतवाडी, वनविभाग, मेळघाट व अमरावती वन विभाग व नांदेड वन विभागात ड्रोनद्वारे हवाई बीज पेरणी करताना नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळचाही त्यामध्ये समावेश करावा, असे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

 

नियोजनबद्ध वृक्ष लागवड व्हावी

वृक्ष लागवड करताना अधिक नियंत्रित पद्धतीने व नियोजनबद्धरित्या करण्यात यावी. यासाठी शासन पूर्ण सहकार्य करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले.

यावेळी वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, वन विभागाचे सहसचिव अरविंद आपटे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) साईप्रकाश, प्रधान मुख्य वनसंरक्षक सर्वश्री प्रवीण श्रीवास्तव, प्रदीप कुमार, एन. के. राव आदि अधिकारी नागपूरहून दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

अशी असते हवाई बीज पेरणी

कमी वेळात जास्त दुर्गम क्षेत्रात व मोठया क्षेत्रावर वृक्षाच्छादन करण्यासाठी हवाई बीज पेरणी हे एक महत्वाचे माध्यम आहे.

त्याचे २ प्रकार आहेत.
१. बीज गोळा पेरणी (Seed ball)
२. रोप लागवड (रोपवाटिकेमधील तयार रोपे)

या पावसाळयात काही निश्चित क्षेत्रावर हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बीज गोळे (seed ball) पेरणी करुन त्या क्षेत्रावर तयार होणाऱ्या रोपवनाचे परिणाम निरिक्षण करण्यात येईल. ड्रोनचा वापर करून बीज गोळा पेरणी करण्यात येऊन त्याची तपासणी करता येईल.

स्थानिक जंगलातील प्रजातींचे जमा केलेले बीज, माती व शेणखत याचे मिश्रण याद्वारे बीज गोळे तयार करुन व त्यांना सुकवून त्यांचा वापर करण्यात येईल.

पाहा व्हिडीओ:


Tags: chief minister uddhav thackerayMaharashtraड्रोनने हवाई बीज पेरणीमहाराष्ट्रमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

धोनीची नवी बिझनेस इनिंग, रामेदव बाबांच्या तुपाला टक्कर

Next Post

खेळांना वाढतं महत्व, ‘खेलो इंडिया’साठी पावणे नऊ हजार कोटी!

Next Post
khelo India

खेळांना वाढतं महत्व, 'खेलो इंडिया'साठी पावणे नऊ हजार कोटी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!