मुक्तपीठ टीम
विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यातील सत्तासंघर्षाला सुरुवात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी बंडाळी केल्याने महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं. या राजकीय सत्तानाट्यात एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सध्या राज्यभरात शिंदे गटाच्या आमदारांकडून शक्तीप्रदर्शन आणि मेळावे घेतले जात आहेत. अशाच एका मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अशा या संपूर्ण घटनेचा अनेक शिवप्रेमी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी निषेध केला आहे.या संपूर्ण घटनेचा अनेक शिवप्रेमी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी निषेध केला आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी निषेध केला आहे.
व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?
- सध्या राज्यभरात शिंदे गटाच्या आमदारांकडून शक्तीप्रदर्शन आणि मेळावे घेतले जात आहेत.
- रविवारी जळगावच्या पाचोर येथील भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
- यशवंत चव्हाण सेंटरमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
- या मेळाव्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
- व्यासपीठावर मान्यवरांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती.
- यावेळी व्यासपीठाच्या एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या.
- कार्यक्रम संपत असताना व्यासपीठावर प्रचंड गर्दी झाली होती.
- या गर्दीमुळे व्यासपीठावरील महापुरुषांची प्रतिमा खाली पडली.
- त्यानंतर उपस्थितांनी लगेच या प्रतिमा पुन्हा उचलल्या.
- परंतु, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अमोल मिटकरींची कडक टीका!
या सगळ्या प्रकाराबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी हा व्हिडिओ ट्विट करत केला आहे. या व्हिडीओसोबत त्यांनी म्हटलं की, राजकारण करा पण महापुरुषांचा असा अनादर होत असेल तर ते जनता सहन करु शकणार नाही. त्यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.