Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“उद्योजकतेला चालना देण्याचे ‘जीआयबीएफ’चे कार्य कौतुकास्पद”

कलराज मिश्रा यांचे प्रतिपादन; 'जीआयबीएफ'तर्फे 'आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय उद्योजकांना संधी'वर चर्चासत्र

July 18, 2022
in घडलं-बिघडलं
0
GIBF 2

मुक्तपीठ टीम

“सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रात देशातील सर्वाधिक ११ कोटी लोकांना रोजगार दिला जातो. देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) या क्षेत्राचा वाटा ३० टक्के आहे. या क्षेत्रातील उद्योजकांना एकाच व्यासपीठावर आणून उद्योजकतेला चालना देण्याचे प्रयत्न ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम (जीआयबीएफ) करत आहे,” असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांनी केले.

GIBF 1

पुण्यातील ‘जीआयबीएफ’ या संस्थेच्या वतीने ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय उद्योजकांना संधी’ या विषयावर चर्चासत्राचे, तसेच ‘नॅशनल बिझनेस एक्सेलन्स अवार्ड्स’चे नुकतेच आयोजन केले होते. प्रसंगी खासदार रामचरण बोहरा, ‘जीआयबीएफ’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. जितेंद्र जोशी, सह-संस्थापक दीपाली गडकरी आदी उपस्थित होते. जपानचे दिवंगत माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

कलराज मिश्रा म्हणाले, “कौशल्य विकासाच्या माध्यमातून उद्योजकतेला चालना देण्याची मोठी गरज देशासमोर आहे. स्थानिक उद्योगांना जागतिक बनवण्यासाठी मोठ्या उद्योजकांनी ‘एमएसएमई’सोबत एकत्र काम केले पाहिजे. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उद्योजकांनी दृढनिश्चय करून काम करावे.” देशाच्या अर्थव्यवस्थेतील ‘एमएसएमई’ क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान मोठे असून, जागतिक स्तरावर एकत्रित काम करण्याची आवश्यकता असल्याचे रामचरण बोहरा म्हणाले.

डॉ. जितेंद्र जोशी म्हणाले, “देशातील लोकसंख्येच्या ६५ टक्के तरुण आहेत. त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात ‘एमएसएमई’चा मोठा वाटा आहे. पंतप्रधानांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि ‘एमएसएमई’ना पुढे नेण्यासाठी ‘जीआयबीएफ’ सातत्याने प्रयत्नशील आहे. देशात व्यवसायासोबतच रोजगाराच्या नव्या संधी वाढत आहेत.” दीपाली गडकरी म्हणाल्या, ‘एमएसएमई’ला पुढे नेण्यात महिलांचा महत्त्वाचा वाटा आहे. आजही देशाच्या आर्थिक विकासात महिला येत आहेत. त्यांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रमात अनेक महिलांचा गौरव करण्यात आला.


Tags: Gobal India Business ForumKalraj MishraMaharashtraMSME Awardकलराज मिश्राजीआयबीएफमहाराष्ट्र
Previous Post

शिंदे गटाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांच्या प्रतिमा पडल्या, शिवप्रेमी आणि मिटकरींची कडक टीका!

Next Post

इंदूरहून जळगावकडे जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात…

Next Post
indore bus Accident

इंदूरहून जळगावकडे जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!