Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जुन्नरमध्ये द्राक्ष महोत्सवाचे आयोजन, खवैयांसाठी वेगळी पर्वणी! पक्षी निरीक्षणाचीही संधी!!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Grapes Festival Organizing

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र पर्यटन संचालनालयामार्फत पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे १८ ते २० फेब्रुवारी या काळात दिवस द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात द्राक्षांच्या बागांतून फेरफटका, द्राक्षांच्या विविध व्यंजनांचा स्वाद चाखण्याची संधी मिळणार आहे. या काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच खाद्य महोत्सव, कृषी पर्यटन आदीचे आयोजन करण्यात आले आहे.
जुन्नर मध्ये आयोजित द्राक्ष महोत्सवाचे पाचवे वर्ष आहे. या महोत्सवात पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल, तसेच कलाकुसर करणारे कारागीर, बचतगट, लघु उद्योजकांच्या व्यवसायाला हातभार लागेल.

 

यामध्ये विविध जातींची द्राक्षे, द्राक्षांपासून बनवलेल्या विविध खाद्यपदार्थांचा तसेच बहारदार द्राक्षांच्या बागांमध्ये फिरण्याचा अनुभव घेता येणार आहे. महोत्सवामुळे पर्यटकांना हेरीटेज वॉक अंतर्गत जुन्नर शहराला लाभलेला ऐतिहासिक वारसा पाहण्याची संधी मिळणार असून, या वॉकमध्ये पंचलिंग मंदिर, शिवसृष्टी, मुघलकालीन खापरी पाईपलाईन, सौदागर घुमट, हबशी महाल इत्यादी ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. रात्री पर्यटकांसाठी कॅम्प फायरची व्यवस्था असणार आहे.

 

पक्षी निरीक्षणाची संधी

जुन्नरमधील देवराईमध्ये किंवा वनपरिक्षेत्रांत निसर्गप्रेमी आणि पक्षीप्रेमींना पक्षी निरीक्षण उपक्रमात सहभागी होता येणार आहे. तसेच कुकडेश्वर मंदिर, नाणेघाट इत्यादी ठिकाणी भेटीचे आयोजन करण्यात आले आहे. शेवटच्या दिवशी हडसर किल्ला किंवा पर्वत गडावर ट्रेकिंगचे आयोजन केले जाणार आहे. त्यानंतर ओझर गावातील गणपती, गीब्सन स्मारक, अंबा अंबिका लेणी समूह, ताम्हाणे संग्रहालय, लेण्याद्री गणपती आदींचे दर्शन घेता येईल. तसेच स्थानिक जुन्नरच्या आठवडी बाजारांमध्ये जाऊन तेथील बाजार पाहता येईल व खरेदी करता येईल.

 

पर्यटक इथे येऊन शेतातील ताज्या द्राक्षांचा आस्वाद घेऊ शकतात. पर्यटक, शेतकरी आणि व्यावसायिक समूदाय यांनी एकत्र येऊन द्राक्षाच्या बाजारपेठेसाठी आर्थिकदृष्ट्या उचललेले हे अत्यंत महत्वाचे पाऊल असणार आहे, अशी माहिती पर्यटन विभागाच्या, पुणे येथील उपसंचालक सुप्रिया करमरकर यांनी दिली आहे.
या महोत्सवात https://bit.ly/3tUCoQL या गूगल लिंकवर जाऊन आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 


Tags: Bird Watching Opportunitybusiness communityfarmersgood newsGrapes Festival OrganizingJunnarMaharashtra Tourism Directoratemuktpeethpune districtTouristsचांगली बातमीजुन्नरद्राक्ष महोत्सव आयोजनपक्षी निरीक्षण संधीपर्यटकपुणे जिल्हामहाराष्ट्र पर्यटन संचालनालयमुक्तपीठव्यावसायिक समूदायशेतकरी
Previous Post

भारतीय तरुणाची कंपनी…काम गुगलसारख्या कंपन्यांच्या चुका शोधणे! ६५ कोटींची कमाई!!

Next Post

राज्यात २ हजार ६८ नवे रुग्ण, ४,७०९ रुग्ण बरे! मुंबई फक्त २०२!!

Next Post
mcr maharashtra corona report

राज्यात २ हजार ६८ नवे रुग्ण, ४,७०९ रुग्ण बरे! मुंबई फक्त २०२!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!