Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारत-पाकिस्तान १९६५चे युद्ध: महार रेजिमेंटच्या शौर्य आणि पराक्रमाच्या सन्मानार्थ भव्य समारंभ

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Mahar Regiment

मुक्तपीठ टीम

पुण्यातील महार रेजिमेंटच्या ज्येष्ठ सैनिकांनी १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान ०३ सप्टेंबर रोजी महार रेजिमेंटच्या नवव्या बटालियनच्या शूर सैनिकांच्या शौर्य आणि पराक्रमाच्या सन्मानार्थ एका भव्य समारंभाचे आयोजन केले होते. याच दिवशी नऊ महार रेजिमेंटचे तत्कालीन कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल डीएन सिंग (नंतरचे ब्रिगेडियर) यांच्या नेतृत्वाखाली बटालियनने ऑपरेशन रिडल अंतर्गत जम्मू आणि काश्मीरच्या अखनूर क्षेत्रातील ट्रोटीच्या जोखीम भरल्या युद्धभूमीवर मातृभूमीचा यशस्वीपणे बचाव केला.

महार रेजिमेंटचे ९व्या बटालियनची ०१ ऑक्टोबर १९६२ रोजी सौगोर येथे एमएमजी बटालियन म्हणून स्थापना झाली. स्थापनेच्या एका वर्षानंतर, बटालियनचे इन्फंट्री बटालियनमध्ये रूपांतर करण्यात आले. या रूपांतरणामध्ये शस्त्रे, उपकरणे, प्रशिक्षण, संघटना आणि बटालियनच्या मूलभूत कार्यामधील बदल समाविष्ट होते.

जून १९६५ मध्ये, स्थापनेच्या अवघ्या तीन वर्षांत नऊ महार रेजिमेंटला जम्मू आणि काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये तैनात करण्यात आले. युद्धाच्या चकमकी सुरू झाल्यावर, बटालियनची रात्रभरात ४१ माउंटन ब्रिगेडच्या अंतर्गत जौरियन, अखनूर येथे रवानगी करण्यात आली आणि मुख्य छांब-जौरियन मार्गावर वर्चस्व असलेल्या ट्रोटी भूभागाचे रक्षण करण्याचे आदेश देण्यात आले. १/२ सप्टेंबर १९६५च्या मध्यरात्री ट्रोटीला पोहोचल्यावर, दुसऱ्या दिवशी सकाळी शत्रूकडून जोरदार हवाई हल्ल्यांना सामोरे जावे लागले तेव्हा बटालियनला बचावासाठी केवळ चार तास मिळाले. ३ सप्टेंबर १९६५ रोजी, सकाळी सात वाजल्यापासून पाकिस्तानने हवाई दल, तोफखाना आणि नंतर रात्री पॅटन टँकच्या रेजिमेंटच्या सहाय्याने मोठ्या सैन्यासह शूर नऊ महार सैन्यावर हल्ला करून ट्रोटी ताब्यात घेण्यासाठी सर्व शक्ती वापरली.

लेफ्टनंट कर्नल डीएन सिंग आणि मेजर एस व्ही साठे आणि मेजर विक्रम चव्हाण यांसारख्या अधिका-यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखालील बटालियनने शत्रूच्या गोळीबाराचा सामना करून, प्रत्यक्ष लढाईत अग्रेसर होऊन आणि भूमिगत राहून हल्ल्याचा बिमोड केला. नऊ महार बटालियन दृढतेने उभी राहिली आणि त्यांनी शत्रूला एक इंचही ताबा दिला नाही. सलग तीन रात्री चाललेल्या या भयंकर युद्धात, सतरा शूर जवानांनी बलिदान दिले आणि युनिटला प्रतिष्ठित युद्ध सन्मान “जौरियन कलित” आणि “थिएटर ऑनर जम्मू आणि काश्मीर” मिळवून देण्यात मदत केली.

प्रतिकूल परिस्थितीतील या युद्धातील धाडसी नेतृत्वाचे उदाहरण असलेल्या मेजर एस व्ही साठे आणि लेफ्टनंट कर्नल विक्रम चव्हाण या दोन युद्धवीरांना सन्मानित करण्यासाठी मेजर जनरल पी शेर्लेकर आणि ब्रिगेडियर अरुण अधिकारी हे दोन्ही महार रेजिमेंटचे प्रतिष्ठित आणि आदरणीय ज्येष्ठ सैनिक यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, महार रेजिमेंटचे कर्नल लेफ्टनंट जनरल बन्सी पूनप्पा यांनी बटालियनसाठी एक सामाजिक व्हिडिओ संदेश देखील जारी केला आणि ‘जौरियन कलित’ च्या लढाईत महार रेजिमेंट आणि त्यांच्या सैनिकांच्या उत्तुंग कामगिरीचा गौरव केला.

पाहा:


Tags: good newsIndia Pakistan warMahar Regimentmuktpeethpuneघडलं-बिघडलंचांगली बातमीपुणेभारत-पाकिस्तान युद्धमहार रेजिमेंटमुक्तपीठ
Previous Post

पारशीवाड्याचा महाराजा: शिवसेना सार्वजनिक गणेशोत्सवातील अक्कलकोट मंदिरात श्री स्वामी समर्थांचं दर्शन!

Next Post

भारतीय रेल्वेकडून ऑगस्ट महिन्यात ११९.३२  दशलक्ष टन मालवाहतूक

Next Post
Indian Railways

भारतीय रेल्वेकडून ऑगस्ट महिन्यात ११९.३२  दशलक्ष टन मालवाहतूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!