Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय रेल्वेकडून ऑगस्ट महिन्यात ११९.३२  दशलक्ष टन मालवाहतूक

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Indian Railways

मुक्तपीठ टीम

भारतीय रेल्वेने  ऑगस्ट २०२२ मध्ये आतापर्यंतची ऑगस्ट महिन्यातील सर्वाधिक म्हणजे ११९.३२  दशलक्ष टन मालवाहतूक नोंदवली आहे. ऑगस्ट महिन्यात ८.६९ दशलक्ष टन इतकी अधिक मालवाहतूक झाली आहे, म्हणजे ऑगस्ट २०२१ मधील सर्वोत्तम आकडेवारीपेक्षा ७.८६% अधिक वाढ नोंदवली आहे.  त्याच बरोबर  भारतीय रेल्वेने सलग २४ महिने सर्वोत्तम मासिक मालवाहतुक केली आहे.

रेल्वेने  ९.२ दशलक्ष टन कोळसा , ०.७१ दशलक्ष टन खते, ०.६८ दशलक्ष टन उर्वरित इतर वस्तू आणि ०.६२ दशलक्ष टन कंटेनर इतकी अधिक मालवाहतूक केली आहे. वाहनांच्या वाहतुकीतील  वाढ हे २०२२-२३ आर्थिक वर्षातील  मालवाहतुकीचे आणखी एक वैशिष्ट्य असून  २०२२-२३ या आर्थिक वर्षात ऑगस्टपर्यंत २,२०६ वाघिणी (रेक्स) मधून वाहतूक करण्यात आली, गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ही संख्या १३१४ रेक्स होती म्हणजे यात ६८%  वाढ झाली आहे.

१ एप्रिल २०२२ ते ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत एकूण मालवाहतूक ६२०.८७ दशलक्ष टन झाली असून २०२१-२२ मधील ५६२.७५ दशलक्ष टनच्या तुलनेत ५८.११ दशलक्ष टन म्हणजे ही वाढ ०.३२% अधिक आहे.

निव्वळ टन किलोमीटर (नेट टन किलोमीटर) मालवाहतूक ऑगस्ट २१ मधील ६३ अब्ज वरून वाढून ऑगस्ट २२ मध्ये ७३ अब्ज पर्यंत गेली  आहे. ही वाढ १६% आहे. पहिल्या पाच महिन्यांत एकत्रित निव्वळ टन किलोमीटर मध्ये १८.२९% इतकी वाढ झाली आहे.

उर्जा आणि कोळसा मंत्रालयाच्या समन्वयाने वीज निर्मिती केंद्रांना  कोळशाचा पुरवठा वाढवण्यासाठी भारतीय रेल्वेचे निरंतर प्रयत्न हे ऑगस्ट महिन्यातील मालवाहतुकीच्या कामगिरीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. वीज निर्मिती केंद्रांना कोळसा पुरवठा  (देशांतर्गत आणि आयात दोन्ही) ऑगस्टमध्ये १०.४६ दशलक्ष टनने वाढला असून ४४.६४ दशलक्ष टन कोळसा वीज केंद्रांना पोहचवण्यात आला , जो गेल्या वर्षी 34.18 दशलक्ष टन होता म्हणजे यात ३१%  वाढ झाली आहे.  याचाच अर्थ या  वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत, रेल्वेने  गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ३२% पेक्षा जास्त वाढीसह ५८.४१ दशलक्ष टन पेक्षा  अधिक कोळसा वीज केंद्रांना पोहचवला आहे.

माल-निहाय वाढ दर्शवते की रेल्वेने बहुतांश सर्व प्रकारच्या मालवाहतुकीत लक्षणीय वाढ नोंदवली आहे:

Commodity Variation (MT) % variation
Coal 9.20 19.26
Fertilizer 0.71 17.10
Balance Other Goods 0.68 7.69
Containers 0.62 9.39
POL 0.28 7.80

पाहा:

 


Tags: Freightgood newsindian railwaysmuktpeethचांगली बातमीभारतीय रेल्वेमालवाहतूकमुक्तपीठ
Previous Post

भारत-पाकिस्तान १९६५चे युद्ध: महार रेजिमेंटच्या शौर्य आणि पराक्रमाच्या सन्मानार्थ भव्य समारंभ

Next Post

IFFI2022 : ‘उद्याचे ७५ सर्जनशील प्रतिभावंत’ साठी माहिती प्रसारण खात्याने मागवल्या प्रवेशिका

Next Post
IFFI2022

IFFI2022 : ‘उद्याचे ७५ सर्जनशील प्रतिभावंत’ साठी माहिती प्रसारण खात्याने मागवल्या प्रवेशिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!