Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इथेनॉलच्या उत्पादनासाठी धान्य डिस्टिलरीज, मका लागवडीला प्रोत्साहन देण्याचीही केंद्राची महाराष्ट्राला सूचना

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Ethanol production

मुक्तपीठ टीम

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशू पांडे यांनी नुकताच महाराष्ट्राचा दौरा केला. या दौऱ्याच्या वेळी त्यांनी राज्यात झालेल्या धान खरेदीची देखरेख करण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील कारधा येथील धान खरेदी केंद्राची पाहणी केली. तसेच इथेनॉलच्या उत्पादनासाठी धान्यावर आधारित डिस्टिलरीज उभारायला आणि त्यासाठी मका लागवडीला प्रोत्साहन देण्याची सूचनाही त्यांनी केली. राइस ब्रान खाद्यतेलाची खरेदी करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये विद्राव्य उत्पादन संयंत्रांना प्रोत्साहन देण्यावर त्यांनी भर दिला. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केल्यामुळे, महाराष्ट्रातील पीकांमध्ये विविधता आणण्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला त्यांनी राज्य सरकारला दिला.

 

या भेटीदरम्यान भारतीय अन्न महामंडळ (FCI), महाराष्ट्र राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि खरेदी संस्थांचे प्रतिनिधी त्यांच्यासोबत होते. खरेदीच्या कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले असले, तरी त्यांनी राज्य सरकारी प्राधिकरणांना खरेदी केंद्रावरील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचा सल्ला दिला. केंद्रातील शेतकऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला आणि त्यांना केंद्राच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले. तसेच धानखरेदीला प्रोत्साहन देणारी आणि भारत सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या धान पिकासाठी शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या नवीन चाचणी पद्धतीची माहितीही त्यांनी दिली.

 

त्यानंतर, अन्न सचिवांनी कारधा येथील स्वस्त धान्य दुकानाला (FPS) भेट दिली, जिथे त्यांनी (FPS) दुकानदार आणि काही लाभार्थ्यांशी (PDS) संवाद साधला. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PM-GKAY) अंतर्गत रेशन वाटप करण्याच्या प्रणालीवर त्यांनी समाधान व्यक्त केले.

 

माननीय पंतप्रधानांनी घोषित केल्यानुसार भविष्यात PDS द्वारे फोर्टिफाइड तांदूळ वितरीत करण्याची योजना भारताने तयार केली आहे, या धोरणाला अनुसरून अन्न सचिवांनी, विशेष करून गोंदिया, भंडारा, चंद्रपूर या भातखरेदी जिल्ह्य़ांत आणि आसपासच्या परिसरात फोर्टिफाइड धान उत्पादन प्रकल्प उभारण्याच्या सरकारच्या निर्णयावर भर दिला.

 

राइस ब्रान खाद्यतेलाची खरेदी करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये विद्राव्य उत्पादन संयंत्रांना प्रोत्साहन देण्यावर त्यांनी भर दिला. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केल्यामुळे, महाराष्ट्रातील पीकांमध्ये विविधता आणण्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला त्यांनी राज्य सरकारला दिला. इथेनॉलच्या उत्पादनासाठी धान्यावर आधारित डिस्टिलरीज उभारण्यावर आणि त्यासाठी मका लागवडीला चालना देण्याचा सल्ला त्यांनी दिला.

 

भारतीय अन्न महामंडळ व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य, एम. एस. सारंग यांनी राज्यातील एफसीआयच्या कार्याची माहिती यावेळी दिली तसेच राज्यातील अन्नधान्य खरेदी, साठवणूक आणि वितरणाशी संबंधित विविध समस्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

पाहा व्हिडीओ: 


Tags: ethanol productionfciFood and Public Distribution Secretary Sudhanshu PandeyGrain DistilleriesMaize plantingmuktpeethअन्न आणि सार्वजनिक वितरण विभागइथेनॉल उत्पादनधान्य डिस्टिलरीजभारतीय अन्न महामंडळमका लागवडमुक्तपीठ
Previous Post

मिनिटाला ६०० गोळ्या झाडणाऱ्या AK-203 रायफलसाठी रशियाशी करार, भारतात उत्पादन

Next Post

होंडा हायनेस सीबी ३५०ची अॅनिवर्झरी एडिशन, तरुणाईला भावणारा क्लासिक लूक

Next Post
Honda Hynes CB350

होंडा हायनेस सीबी ३५०ची अॅनिवर्झरी एडिशन, तरुणाईला भावणारा क्लासिक लूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!