Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईच्या गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू…मुख्यमंत्र्यांकडून कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
मुंबईच्या गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू…मुख्यमंत्र्यांकडून कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर!!

मुक्तपीठ टीम

गेल्या दोन वर्षांनंतर यंदाचे सर्व सण निर्बंधमुक्त आणि उत्साहात साजरे करता येणार असल्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली. त्यानुसार यंदाची दहीहंडी धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. अनेक बड्या नेत्यांनी दहीहंडीचं आयोजन केलं होतं. दहीहंडीच्या जल्लोषादरम्यान, अनेक गोविंदा जखमी झाले, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यापैकीच एक अवघ्या २२ वर्षांच्या गोविंदा संदेश दळवीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. संदेश दळवी हा शिव शंभो गोविंदा पथकाचा गोविंदा होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झालेली घटना दुर्दैवी असल्याचं म्हणत, संदेश दळवी याच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर केली आहे.

संदेश दळवीची मृत्यूशी झुंज अपयशी!!

  • दहिहंडीमध्ये जखमी झालेल्या मुंबईतील संदेश दळवीचा मृत्यू झाला आहे.
  • संदेशच्या डोक्याला इजा झाली होती.
  • रविवारी त्याला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
  • डोक्याची शस्रक्रिया झाली होती, पण गंभीर दुखापत झाल्यानं संदेश दळवीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
  • संदेश दळवीचा रुग्णालयातील एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.
  • शिवसेनेचे पदाधिकारी जितेंद्र जनावणे यांनी उपचारासाठी मदत केली असल्याचं त्यामध्ये दिसून येतं.
  • दुसरीकडे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रविण दरेकर यांनी संदेश दळवीच्या कुटुंबाला मदत केली जाईल, असं म्हटलं.

संदेशच्या पथकातील आणखी एक तरुणही जखमी!!

  • संदेश अवघ्या २२ वर्षांचा होता.
  • घरामध्ये आई-वडील आणि आपल्या भावंडांसह तो राहत होता.
  • संदेश सर्वात लहान होता.
  • संदेश दळवी हा मूळचा विले पार्ले येथील असून काही दिवसांपूर्वी त्याचं कुटुंब कुर्ला येथे राहायला गेले होते.
  • संदेश हा विलेपार्ले पूर्वेकडील शिवशंभो गोविंदा पथकात सामील होता.
  • हे पथक शुक्रवारी रात्री विलेपार्ले पूर्वेकडील बामनवाडा भागात दहीहंडी फोडण्यासाठी गेले होते.
  • यावेळी दहीहंडीच्या सर्वात वरील सातव्या थरावरून कोसळून संदेश जखमी झाला होता.
  • त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
  • मंडळाच्या तरुणांनी त्याला तात्काळ कूपर रुग्णालयात दाखल केले होते.
  • मात्र त्याची तब्येत सुधारत नसल्याने रविवारी दुपारी त्याला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
  • उपचारादरम्यान सोमवारी रात्री ९ वाजता संदेशचे निधन झाले.
  • यावेळी विनय शशिकांत रांबाडे (वय २० वर्ष) संदेश प्रकाश दळवी, वय २२ वर्षे हे दोघेजण दहीहंडी फोडत असताना खाली पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
  • विनयवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पाहा व्हिडीओ:


Tags: Cm Eknath ShindedahihandiGovindaSandesh Dalaviगोविंदादहीहंडीमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसंदेश दळवी
Previous Post

शिवसेना कोणाची? पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाचा निकाल कधी?

Next Post

शिवसेना कुणाची? : सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ का? जाणून घ्या हे महत्वाचे मुद्दे…

Next Post
Maharashtra Political Crisi

शिवसेना कुणाची? : सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ का? जाणून घ्या हे महत्वाचे मुद्दे...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!