Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“युवा पिढीने देश रक्षणासाठी आघाडीवर येणे हीच जनरल बिपीन रावत यांना खरी श्रद्धांजली” – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

जनरल बिपीन रावत यांच्या जीवनकार्यावरील स्मरणिकेचे राजभवन येथे प्रकाशन

April 29, 2022
in सरकारी बातम्या
0
Hon Governor Koshyari releases souvenir of General Bipin Rawat 2

मुक्तपीठ टीम

उत्तराखंडचे महान सुपुत्र असलेले देशाचे पहिले संयुक्त लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्राला समर्पित केले.  जनरल बिपीन रावत यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन युवा पिढीने देश रक्षणासाठी पुढे येणे हीच यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे उद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले.  

Hon Governor Koshyari releases souvenir of General Bipin Rawat                 

सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या जीवन कार्याचा परिचय तसेच त्यांच्या वरील लेखांचे संकलन असलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.            

‘उत्तरांचल महासंघ, मुंबई‘ या संस्थेच्या वतीने स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला आमदार मंगलप्रभात लोढा, उत्तरांचल महासंघाच्या अध्यक्ष्या आनंदी गैरोला, महेंद्रसिंह गुसाईं व कुसुमलता गुसाईं प्रामुख्याने उपस्थित होते.            

उत्तराखंड राज्यात लष्करात भरती होऊन देशसेवा करण्याची परंपरा आहे. राज्याने जनरल बी सी जोशी व जनरल बिपीन रावत यांसारखे महान योद्धे सुपुत्र देशाला दिले आहेत. प्रत्येक जण त्यांची उंची गाठू शकणार नाही, परंतु देशासाठी काही ना काही योगदान देण्याचा प्रयत्न प्रत्येकाने अवश्य केला पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.             

इस्रायल देशात सार्वजनिक ठिकाणी देशासाठी बलिदान देणाऱ्या त्या भागातील लष्करी जवानांचा परिचय असलेले शिलालेख लावण्यात येतात असे सांगून जनरल बिपीन रावत यांच्या कार्याची माहिती शालेय मुलांना व्हावी यासाठी आपण २००० शाळांमध्ये जनरल बिपीन रावत यांच्या स्मरणिकेचे वाटप करणार असल्याचे लोढा यांनी सांगितले.


Tags: bhagat singh koshyariCDS Bipin Rawatजनरल बिपीन रावत स्मरणिकाराज्यपाल भगतसिंह कोश्यारी
Previous Post

राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मे २०२२ मध्ये आयोजन – अमित देशमुख

Next Post

केंद्र सरकारकडे महाराष्ट्राचे नेमके किती हजार कोटी थकित?

Next Post
GST Issuse

केंद्र सरकारकडे महाराष्ट्राचे नेमके किती हजार कोटी थकित?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!