Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यपालांच्या हस्ते शेतकऱ्यांसाठी ‘वंदे किसान ॲप’चे लोकार्पण

शेतीचे आधुनिक ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कृषी विद्यापीठांना आवाहन

December 3, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
koshyari

मुक्तपीठ टीम

कृषी उत्पादने व कृषी आधारित वस्तूंचे भौगोलिक मानांकन होऊन त्यावर पेटंट मिळविले तर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे दुप्पट ते चौपट दाम मिळेल असे सांगून शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचे नवीनतम ज्ञान देश विदेशातून मिळविले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

 रासायनिक शेतीचे दुष्परिणाम पाहून शेतकऱ्यांनी पुन:श्च सेंद्रिय शेतीची कास धरावी असे सांगताना कृषी विद्यापीठांनी शेतीचे आधुनिक ज्ञान व तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी आपण सर्व कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंना सूचना करू, असे  राज्यपालांनी सांगितले.

वंदे भारत विकास फाउंडेशन व ॲडराईज इंडिया यांनी शेतकऱ्यांच्या शिक्षण, प्रशिक्षण व कौशल्यवर्धनासाठी विकसित केलेल्या ‘वंदे किसान ॲप’चे लोकार्पण राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. २) राजभवन येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

 यावेळी आमदार आशिष शेलार, ॲडराईज इंडिया व वंदे भारत विकास फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद कुलकर्णी, व्यवस्थापकीय भागीदार अनिरुद्ध हजारे, प्रगतिशील शेतकरी पद्मश्री राहीबाई पोपेरे, डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजय सावंत प्रामुख्याने उपस्थित होते.

देश अन्नधान्याच्या बाबतीत आयातदार असल्याचे आपण पहिले आहे. त्याकाळात  देशात अमेरिकेकडून निकृष्ट गहू येत होता. भारताने गेल्या ४० -५० वर्षांत कृषी क्षेत्रात मोठी प्रगती केल्याने कोरोना संकट काळात अर्थव्यवस्था मजबूत राहिली. अन्नधान्याच्या बाबतीत देश आज स्वयंपूर्ण आहे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

 आज गावागावातील शेतकऱ्यांना नवीनतम ज्ञान हवे आहे. मोबाईल ॲप व डिजिटल माध्यमातून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मोबाईल कनेक्टिव्हीटी चांगली असली पाहिजे असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.  वंदे किसान डिजिटल व्यासपीठ हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून त्यातून हे ॲप देशभर प्रचलित होईल असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

koshyari 2

‘प्रत्येक गावात देशी वाणाची बीज बँक असावी: पद्मश्री राहीबाई पोपेरे

हायब्रीड बियाणे तसेच रासायनिक शेतीमुळे अनेक आजार वाढले आहेत. त्यामुळे आपल्या भावी पिढ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी तसेच प्रत्येक गावात देशी वाणाची बीज बँक असावी असे बीज बँकेच्या पुरस्कर्त्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी यावेळी सांगितले.

 

यावेळी राज्यपालांच्या हस्ते विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी धीरज जुनघरे, डॉ.सदानंद राऊत, शेती हवामान तज्ज्ञ डॉ.उदय देवळाणकर, ज्ञानेश्वर बोडके, डॉ. सूर्यकांत गुंजाळ, नारायणगाव ग्रामोन्नती कृषी मंडळ संस्थेचे अनिल मेहरे, कृषी पर्यटन तज्ज्ञ चंद्रशेखर भडसावळे, कुलगुरू डॉ.संजय सावंत, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


Tags: bhagat singh koshyariFarmingmuktpeethVande Bharat Vikas FoundationVande Kisan Appभगत सिंह कोश्यारीमुक्तपीठवंदे किसान ॲपवंदे भारत विकास फाउंडेशनशेती
Previous Post

गांधी नावाची किंमत पंतप्रधान मोदींना कळणार नाही

Next Post

“बंदूक हाती असणार्‍यांचा मुकाबला सोपा, पण जे विचारांनी पोखरताहेत, त्यांच्याशी मुकाबला कठीण!”

Next Post
Fadnavis on Amravati violence and urban Naxalism 3-12-21

"बंदूक हाती असणार्‍यांचा मुकाबला सोपा, पण जे विचारांनी पोखरताहेत, त्यांच्याशी मुकाबला कठीण!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!